काफियाचा प्रश्न

आह को चाहिये इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक

दाम हर मौजमे है हल्का-ए-सद्-काम्-ए-नहंग
देखे क्या गुजरे है कतरे पे गौहर होने तक

आशिकी सब्र-तलब और तमन्न बेताब
दिल का क्या रंग करूं खुन-ए-जिगर होने तक

वरील ओळींकडे नीट पहा...

मतल्यामध्ये 'सर होने तक' असा सामायिक शब्दसंच आहे. त्यामुळे त्यामागील स्वर अर्थातच 'अलामतीचा' असला पाहिजे. पण, पहिल्या ओळीत 'अ' आणि दुस-या ओळीत 'ए' असा स्वर आहे. इथे अलामतीचा घोळ म्हणावा का?

अलामतीच घोळ मान्य केला तरी मतल्यातील 'सर होने तक' हा शब्दसंच पुढे कुठेच नाही.
पुढे सर्व ठिकाणी 'र होने तक' असाच शब्दसंच आहे.

म्हणजेच 'अ' ही अलामत घेऊन  'अर होने तक' असा शब्दसंच घ्यावा लागतो आहे.

मग मतल्यामध्ये 'सर होने तक' असे का घेतले गेले? त्याच ठिकाणी ही सूट का घेतली गेली नाही?

की मतल्यात सूट न घेताही पुढे आपण बदल करू शकतो? किंवा त्याला अपवाद मानून ते स्वीकारू शकतो?

(मला उर्दूचे ज्ञान नाही. पण जे दिसले ते विचारले.)

कलोआ चूभूद्याघ्या.

गझलचर्चा: 

प्रतिसाद

फार चांगले केलेत जे आपण हे विचारलेत.  ( मनापासून म्हणतोय )
उर्दूमधे असल्या गोष्टींना तितके महत्व नाही हे मी ज्या पाच पन्नास उर्दू गझला वाचल्या आहेत त्यावरून मला जाणवले.
त्यात आशयाला पहिले प्राधान्य आहे.
बाकी सगळे नंतर!
मागे एकदा मी हाच विचार मांडला होता.
तो विचार असा: ( समीर चव्हाण यांच्या 'जाणीव' या गझलेवर )
नुसतीच कोंदणे दिसतायत, त्याच्या आत जे असायला हवे ते दिसत नाही!
त्यावर सल्ला मिळाला की आधी मी चांगले लिहावे. ते खरेच आहे, पण उर्दूमधे त्या गोष्टींना तितके महत्व नाही हे खरे आहे.
 
उर्दूमधे सरळसरळ उच्चाराप्रमाणे वृत्त ठरते हे याही गझलेत दिसेल.
जुल्फ के सर होने तक - यामधे जुल्फ नंतरचा जो 'के' आहे तो मराठीमधे २ मात्रांचा धरला गेला असता. इथे तो एकाच मात्रेचा असल्याप्रमाणे दिसतो किंवा वापरला जातो. म्हणजे उच्चारताना 'के' हे अक्षर जितक्या वेगात म्हंटले जाईल त्यावर ते गझलेत कुठे बसवायचे हे ठरू शकते असे दिसते.  शेवटी कविता हे गणित नसून भावनेशी संबंधित बाब आहे हे मान्य करायलाच पाहिजे.
त्यावर मी माझ्या ( शौकीन का आहे - सध्या ही गझल (?) विचाराधीन विभागात आहे की काय माहीत नाही ) एक शेरही रचला होता.
कवितेचे गणिताचे प्रेम पाहुनी कळले
प्रत्येक गझल माझी विचाराधीन का आहे
  
अगदी हाच प्रश्न मी मागे दुसर्‍या साईटवर विचारला होता -
http://www.marathigazal.com/node/73

आह को चाहिये इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक
देवनागरी लिपीत दोन्ही सर सारखेच पण उर्दू लिपीत वरच्या
ओळीतले 'स' आणि खालच्या ओळीतला 'स' दोन्ही वेगवेगळे आहेत.  हे आपल्या 'ष' आणि 'श'
सारखे आहे.  वरच्या ओळीत 'से' आहे तर खालच्या ओळीत 'सिन' आहे.

 اثر असर

سر सर

उर्दूत ह्या गोष्टींना (अलामतीचे नियम)महत्त्व नाही असे म्हणणे चूक आहे.उर्दूचे
वळण वेगळे आहे.  'तेरे' चे 'तिरे' 'मेरे' चे 'मिरे, 'पे' चे 'प' असे आणि
'के' चे 'क' असे उच्चार करून वृत्त सांभाळून घेतात. मराठीत असे करणे सहज
वाटत नाही.

देखे क्या गुजरे है कतरे पे गौहर होने तक
इथे गुहर हवे

मा. चित्तरंजन यांनी हा विषय छान समजाविला आहे असे मला वाटते. उर्दूमधे 'स' चे एवढे प्रकार असतील असे वाटले नव्हते..(म्हणजे माहितच नव्हते).
अशाच प्रकारे आणखी काही दाखले उर्दूच्या जाणकारांना देता आल्यास सोन्याहून पिवळे.
तसेच वृत्त सांभाळून घेण्यासाठी मराठीतही काही क्लुप्त्या वापरता येतील का याचाही सर्वांनी विचार करावा.
कलोअ चूभूद्याघ्या

मराठीमधे उच्चाराप्रमाणे वृत्त असायला हरकत का असावी असा माझा प्रश्न आहे.
उदाहरणासाठी उगाचच परक्या कवीच्या ओळी देणे योग्य नसल्याने मी माझ्याच एका कवितेतल्या चुकलेल्या ओळी इथे देत आहे.
शोधू नका सुखाला भासेल एक तारा
दु:खाने युक्त सारा आसमंत आहे
किती क्रूर व्हावी दुनिया याला सुमार नाही
किती बंड मी करावे याचाच अंत आहे
आरंभ नाही त्याचा दिसला मला कुठेही
नुसताच देव म्हणतो की तो अनंत आहे
माझ्या चुकांची यादी करताय तर करा पण
कळुदे मलाही कोण तुमच्यात संत आहे
हे पाहणे तुझे अन ना पाहिल्याप्रमाणे
फिरवून मान घेणे ला पसंत आहे
किती मोकळ्या हवेची तुम्ही बांधता घरे रे
पण दार पाहिजे तर तेथेच भिंत आहे
असतील आणि काही नशिबात दु:ख माझ्या
नेऊ नका मला मी अजुनी जिवंत आहे
यातील जवळजवळ प्रत्येक ओळ चुकलेली आहे.  ही गझल नसून एक कविता आहे कारण मुळातच मी मतलाच रचलेला नाही.
माझा प्रश्न असा आहे की 'किती' मधला 'ती', 'चुकांची' मधला 'ची', 'तुम्ही' मधला 'म्ही', 'मला' मधला 'म' यासारखी वर चुकलेली जी अक्षरे आहेत ती म्हणताना मात्र अनेक वेळा 'ह्रस्व' किंवा वेगळ्या पद्धतीने उच्चारली जातात. म्हणजे 'किती विचित्र प्रकार आहे हा' हे वाक्य म्हणताना 'किति विचित्र प्रकार आहे हा' असे म्हंटले जाऊ शकते. तसेच 'मला काय विचारता?' हा प्रश्न विचारताना 'माला काय विचारता?' असा विचारला जाऊ शकतो. मात्र उच्चाराप्रमाणे ते कवितेत घेतले तर योग्य वाटत नाही. म्हणजे कवितेत 'मला' ऐवजी 'माला' असा शब्द घेणे टीकेस पात्र तर ठरू शकतेच पण 'माला' या शब्दाचा अर्थच वेगळा घेतला जाऊ शकतो. मग 'मला' चे 'मजला' करावे लागते. 'मजला' म्हंटले की पद्यात्मक होत असले तरीही जरा कृत्रिम वाटते, पण 'मजला'च घ्यावे लागते.
मी नम्रपणे भटसाहेबांची ही ओळ फक्त माझ्या मुद्याच्या पुष्ट्यर्थ घेत आहे.
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा 
इथे 'आमच्यासाठी' म्हणता येणार नाही कारण पुढे ओळीत 'माझा' हा शब्द आहे. 'माझ्यासाठी' हे वृत्तात बसणार नाही. 'आपल्यासाठी' किंवा 'की स्वतःसाठी' हे बसले असते पण त्यातला 'की' हा एक अनावश्यक शब्द ठरू शकेल. 'माझिया' असे बोली भाषेत म्हंटले जात नाही पण ते कवितेत आले आहे. ( माफ करा, माझी इतकी पात्रता नाही की इतक्या मोठ्या माणसाबद्दल मी काही म्हणावे, खरे तर मी तसे काही म्हणू इच्छीतही नाही व म्हणतही नाहीये, पण अशा गोष्टीसाठी हलक्याफुलक्या शायराचे उदाहरण दिले तर कितपत गंभीरपणे घेतले जाईल याचीच शंका आली व ही ओळ सर्वश्रूत आहे म्हणुन घेतली. गैरसमज नसावेत .)
पणः
'नाहि माझ्यासाठि माझा पेटण्याचा सोहळा'
अशी ओळही अमान्य ठरू शकली असती कारण त्यात तडजोडी आहेत. ( मुळात मी दिलेला पर्याय चांगला नाही हे मलाही मान्य आहेच )
पणः
हे फक्त एक उदाहरण आहे.  कित्येक कविता किंवा ओळी अशा सुचतात की ज्यात या स्वरुपाच्या तडजोडींमुळे अत्यंत सुंदर आशयाचा त्याग करावा लागतो. त्यावेळेला लेखी भाषेपेक्षा बोली भाषेचा आधार घेण्यात काय गैर आहे असा माझा प्रश्न आहे.
हे उर्दूच्या बाबतीत होत नसावे असा माझा अंदाज आहे.

The topic as well as explainations offered by the experts are good. But, I could not grasp the final conclusion.  Experts are requested to confirm if it would be appropriate to conclude the following:
1. The रदीफ of the ghazal is होने तक.
2. The काफिया are असर, सर, गुहर, जिगर, etc.
3. The unchanging group of letters in the Kafiya is "र "only.
4. अलामत is "अ".
5. Is the ghazal following the rules of अलामत etc. or there are lapses?
If these conclusions are incorrect, I shall be thankful for pointwise clarifications.
Regards,

I had heard a sher in a kawwali and the second misra was:
"Jo ali mile to nabi mile, jo nabi mile to khuda mila". I don't remember the first misra. Can anyone help with the first one?
Regards,
PS. I don't know how to start the new Discussion and if I am authorized to do so, in the first place! Hence, putting  the query under the discussion on another topic.

कला हा मालकी हक्क नाही. कला ही कलाकारांसमोर सादर करताना कलेच्या आत्म्याबरोबरच ( आशयाबरोबरच ), तंत्र महत्वाचे असते. मात्र बहुतांशी कला ही सामान्य माणसापुढे सादर केली जाते. तिथे तंत्राला फारसे महत्व नसते. तिथे कला 'समजली' व 'आवडली' की मान्यता पावते. तसेच महान कलाकार म्हणुन पावतीपण 'त्या' सामान्य रसिकांकडुनच मिळते. एखाद्या मराठी मुशायर्‍यात सगळेच गझलकार आहेत  अशा ठिकाणी त्यातल्या एका गझलकारालाच अशी पावती  मिळणे कितपत शक्य आहे यावर भिन्न मते असतील. पण मी वाचलेल्या एका पुस्तकात खालील किस्सा दिला आहे.
राजदरबारात उर्दू मुशायरा भरलेला होता. गालिब व मोमीन दोघेही होते. मोमीनने एक शेर सादर केला:
तुम मेरे पास होते हो गया
जब कोई दुसरा नही होता ( गोया हा शब्द प्रेयसी व इश्वर दोघांनाही उद्देशून )
दस्तूर असा की शेर सादर झाल्यावर बादशहाने स्तुतीपर किंवा प्रतिक्रियात्मक देहबोली दर्शवल्यास इतरांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी. ( हा काळ तो जेव्हा बादशहाच्या मर्जीतला शायर होण्यासाठी चढाओढ असायची ). बादशहा बोलेपर्यंत बाकीच्यांनी बोलायचे नाही.
आता शेराच्या अर्थाची खोली पहा:
जेव्हा जेव्हा मी कुठल्याही व्यापातून मोकळा होतो तेव्हा लगेच मला तुझी आठवण होते. किंवा जेव्हा जेव्हा माझे मन जरासे मोकळे व्हायला लागते,लगेच तू माझ्या मनाला व्यापतेस ( तोस ).
हा अत्यंत श्रेष्ठ विचार झाला.
यावर बादशहा काय म्हणतो, काही म्हणतो की नाही, आपण स्तुती केली तर हा नवीन शायर बादशहाच्या नजरेत भरेल वगैरे वगैरे काहीही विचार न करता गालीबने भर दरबारात जाहीरपणे उत्स्फुर्त  प्रशंसा केली की हा शेर अत्यंत महान शेर असून मोमीनने हा शेर गालीबच्या नावाने खपवल्यास गालीब आपला अख्खा 'दीवान-ए-गालीब' मोमीनच्या नावाने करायला तयार आहे.  ही जाहीर प्रशंसा ऐकून दरबाराततील लोक घाबरले की ही तर राजाची तौहीन झाली. पण बादशाहने मान तुकवून दाद दिली तसे सगळेच त्या शेराची प्रशंसा करायला लागले. अर्थ इतकाच घ्यावा की शेराच्या अर्थाकडे नि:स्वार्थीपणे आकर्षित होण्याची प्रवृत्ती आता कितपत आहे अन तेव्हा कितपत होती. वृत्तातील चुका काढण्याची प्रवृत्ती आता कितपत आहे अन तेव्हा किती असावी?
कारण उर्दूतले कित्येक गाजलेले शेर आपल्याला थोडे विचित्रच वाटतात, तांत्रिकदृष्ट्या!
 
कला का सादर करावी याची आपली आपली कारणे प्रत्येकाने हवी तशी मानावीत.
मी व्यक्तिशः अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करतो की माझ्या कवितेतून दुसर्‍याला आनंद मिळालाच पाहिजे असा माझा आग्रह असतो. तो मिळतो की नाही हा भाग वेगळा, पण मी फक्त म्हणजे फक्त स्वतः अंतर्मुख होण्यासाठी, स्वतःच संतुष्ट होण्यासाठी वगैरे कविता रचत नाही. मला माझी ती कविता सर्वात जास्त आवडते जी दुसर्‍यांनाही  आवडते. इतके नक्की, की मला जर माझ्या कवितेतून हवा तो आनंद एकट्यालाच ( इतरांना कसलाही आनंद न मिळता ) मिळत असता तर मी माझ्या तथाकथित गझला इथे सादर केल्याच नसत्या. स्वतःच रचून त्या स्वतःच वाचत बसलो असतो. तेव्हा गालिबच्या वरील रचनेत काफिया कोणता, रदीफ कोणची, अलामत काय, वृत्त काय हे विचार करून माणूस कुठेही पोचणार नसून त्या गझलेतील विचार कसे वाटतात हा प्रश्न आहे. आता दोन 'स' वेगवेगळ्या पद्धतीने उर्दूमधे लिहिले जातात म्हंटल्यावर देवनागरीमधे त्या गोष्टींचा अंदाज करत बसणारे चुकणारच. पण असफल प्रेमावर मराठीमधे रचलेली एकही मुसलअसल गझल मी अशी बघितली नाही जी वरील गझलेच्या जवळपास जाऊ शकते. कुणी बघितली असल्यास कृपया येथे प्रतिसादात लिहावी. ( अर्थात, ती गझल याच साईटवर गझललेखन करणार्‍यांची नसावी अशी किमान अपेक्षा, कारण तशी रचलीही जाऊ शकते). मुद्दा इतकाच मांडायचा आहे की तुम्ही बोलताना कसे बोलता तसे गझल वाचतानासुद्धा वाचू शकता की नाही? म्हणजे वाचताना 'मजला', तुजला', 'तव' हे शब्द थोडे तरी कृत्रिम वाटतात की नाही? तसेच गझल हा एक 'संवाद' आहे असेही म्हंटले जाते. मग संवाद कुठल्या भाषेत केला जातो? बोली भाषेत! ह्याच कारणासाठी माझे असे स्पष्ट मत आहे की वृत्ताचे अवडंबर माजवणे योग्य नाही.  'मला' चा उचार बोली भाषेत जर 'माला' असा केला जात असेल तर शब्द 'माला' असा लिहावा अश्या मताचा मी आहे. तो 'मजला' असा लिहून क्रुत्रिम पद्यात्मकता आणण्यात काही अर्थ नाही कारण त्याने ओळ रसिकाच्या मनाला भिडायला वेळ लागेल किम्वा भिडणारच नाही.
 
कला हा मालकी हक्क नाही. कला ही कलाकारांसमोर सादर करताना कलेच्या आत्म्याबरोबरच ( आशयाबरोबरच ), तंत्र महत्वाचे असते. मात्र बहुतांशी कला ही सामान्य माणसापुढे सादर केली जाते. तिथे तंत्राला फारसे महत्व नसते. तिथे कला 'समजली' व 'आवडली' की मान्यता पावते. तसेच महान कलाकार म्हणुन पावतीपण 'त्या' सामान्य रसिकांकडुनच मिळते. एखाद्या मराठी मुशायर्‍यात सगळेच गझलकार आहेत  अशा ठिकाणी त्यातल्या एका गझलकारालाच अशी पावती  मिळणे कितपत शक्य आहे यावर भिन्न मते असतील. पण मी वाचलेल्या एका पुस्तकात खालील किस्सा दिला आहे.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>

राजदरबारात उर्दू मुशायरा भरलेला होता. गालिब व मोमीन दोघेही होते. मोमीनने एक शेर सादर केला:

तुम मेरे पास होते हो गया
जब कोई दुसरा नही होता ( गोया हा शब्द प्रेयसी व इश्वर दोघांनाही उद्देशून )

दस्तूर असा की शेर सादर झाल्यावर बादशहाने स्तुतीपर किंवा प्रतिक्रियात्मक देहबोली दर्शवल्यास इतरांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी. ( हा काळ तो जेव्हा बादशहाच्या मर्जीतला शायर होण्यासाठी चढाओढ असायची ). बादशहा बोलेपर्यंत बाकीच्यांनी बोलायचे नाही.

आता शेराच्या अर्थाची खोली पहा:

जेव्हा जेव्हा मी कुठल्याही व्यापातून मोकळा होतो तेव्हा लगेच मला तुझी आठवण होते. किंवा जेव्हा जेव्हा माझे मन जरासे मोकळे व्हायला लागते,लगेच तू माझ्या मनाला व्यापतेस ( तोस ).

हा अत्यंत श्रेष्ठ विचार झाला.

यावर बादशहा काय म्हणतो, काही म्हणतो की नाही, आपण स्तुती केली तर हा नवीन शायर बादशहाच्या नजरेत भरेल वगैरे वगैरे काहीही विचार न करता गालीबने भर दरबारात जाहीरपणे उत्स्फुर्त  प्रशंसा केली की हा शेर अत्यंत महान शेर असून मोमीनने हा शेर गालीबच्या नावाने खपवल्यास गालीब आपला अख्खा 'दीवान-ए-गालीब' मोमीनच्या नावाने करायला तयार आहे.  ही जाहीर प्रशंसा ऐकून दरबाराततील लोक घाबरले की ही तर राजाची तौहीन झाली. पण बादशाहने मान तुकवून दाद दिली तसे सगळेच त्या शेराची प्रशंसा करायला लागले. अर्थ इतकाच घ्यावा की शेराच्या अर्थाकडे नि:स्वार्थीपणे आकर्षित होण्याची प्रवृत्ती आता कितपत आहे अन तेव्हा कितपत होती. वृत्तातील चुका काढण्याची प्रवृत्ती आता कितपत आहे अन तेव्हा किती असावी?

कारण उर्दूतले कित्येक गाजलेले शेर आपल्याला थोडे विचित्रच वाटतात, तांत्रिकदृष्ट्या!

कला का सादर करावी याची आपली आपली कारणे प्रत्येकाने हवी तशी मानावीत.

मी व्यक्तिशः अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करतो की माझ्या कवितेतून दुसर्‍याला आनंद मिळालाच पाहिजे असा माझा आग्रह असतो. तो मिळतो की नाही हा भाग वेगळा, पण मी फक्त म्हणजे फक्त स्वतः अंतर्मुख होण्यासाठी, स्वतःच संतुष्ट होण्यासाठी वगैरे कविता रचत नाही. मला माझी ती कविता सर्वात जास्त आवडते जी दुसर्‍यांनाही  आवडते. इतके नक्की, की मला जर माझ्या कवितेतून हवा तो आनंद एकट्यालाच ( इतरांना कसलाही आनंद न मिळता ) मिळत असता तर मी माझ्या तथाकथित गझला इथे सादर केल्याच नसत्या. स्वतःच रचून त्या स्वतःच वाचत बसलो असतो. तेव्हा गालिबच्या वरील रचनेत काफिया कोणता, रदीफ कोणची, अलामत काय, वृत्त काय हे विचार करून माणूस कुठेही पोचणार नसून त्या गझलेतील विचार कसे वाटतात हा प्रश्न आहे. आता दोन 'स' वेगवेगळ्या पद्धतीने उर्दूमधे लिहिले जातात म्हंटल्यावर देवनागरीमधे त्या गोष्टींचा अंदाज करत बसणारे चुकणारच. पण असफल प्रेमावर मराठीमधे रचलेली एकही मुसलअसल गझल मी अशी बघितली नाही जी वरील गझलेच्या जवळपास जाऊ शकते. कुणी बघितली असल्यास कृपया येथे प्रतिसादात लिहावी. ( अर्थात, ती गझल याच साईटवर गझललेखन करणार्‍यांची नसावी अशी किमान अपेक्षा, कारण तशी रचलीही जाऊ शकते). मुद्दा इतकाच मांडायचा आहे की तुम्ही बोलताना कसे बोलता तसे गझल वाचतानासुद्धा वाचू शकता की नाही? म्हणजे वाचताना 'मजला', तुजला', 'तव' हे शब्द थोडे तरी कृत्रिम वाटतात की नाही? तसेच गझल हा एक 'संवाद' आहे असेही म्हंटले जाते. मग संवाद कुठल्या भाषेत केला जातो? बोली भाषेत! ह्याच कारणासाठी माझे असे स्पष्ट मत आहे की वृत्ताचे अवडंबर माजवणे योग्य नाही.  'मला' चा उचार बोली भाषेत जर 'माला' असा केला जात असेल तर शब्द 'माला' असा लिहावा अश्या मताचा मी आहे. तो 'मजला' असा लिहून क्रुत्रिम पद्यात्मकता आणण्यात काही अर्थ नाही कारण त्याने ओळ रसिकाच्या मनाला भिडायला वेळ लागेल किम्वा भिडणारच नाही.

हे मी माझ्या तथाकथित गझला वृत्तात न लिहू शकता म्हणत नसून वृत्तात लिहू शकत असताना म्हनत आहे हे कृपया लक्षात घ्यावेत.

एवढे का पेटलेय या विषयावर?