रस्ता
हा ओळ्खीचा रस्ता
नेई कुठे ?... हा रस्ता
सांभाळ...तेथे खड्डा
घेई कुशी, हा रस्त्ता
वळणात वळतो सहजी
साधा.. सरळ.. हा रस्ता
ना एकदाही गेला
गावी तुझ्या हा रस्ता
चौकात एक दुज्याला
गाठून भेटे हा रस्ता
ठावूक हे कोणाला
झोपे कधी हा रस्ता ?
'धरतो नभा' म्हणूनी
उंचावला हा रस्ता
सोसून सार्या घावा
भेगाळला हा रस्ता
मागे निरोप कुणाचे
वाटांकडे हा रस्ता
मज रोज येता-जाता
सांगे कथा हा रस्ता
बघ, बोळ झाला आता
होता कधी हा रस्त्ता
वसले तिथे ते सारे
दारी जिथे हा रस्ता
ते झोपले वाटसरू
घेऊन उशीला रस्ता
कोण्या अनाथा वाटे
बापापरी हा रस्ता
मी थांबता, तो सोबत
बघ, थांबला हा रस्ता
गझल:
प्रतिसाद
कौतुक शिरोडकर
बुध, 12/11/2008 - 10:37
Permalink
रस्ता
वृत्त, अलामत अशा तांंत्रिक बाबी सांभा़ळून लिहीता येते की नाही हे पहाण्यासाठी लिहीलेली गझल. यात गझलियत आहे की नाही हे तुम्ही सांगालच. यात काय काय चुकलय हे जाणून घेण्यासाठी हा खटाटोप.
भूषण कटककर
गुरु, 13/11/2008 - 11:16
Permalink
निगेटीव्ह
या गझलबाबत माझ्या मनात निगेटीव्ह विचार आहेत.
सॉरी!