घाव
नजर पडली मजवरी कोरी शिवीही द्या कुणी
हृदय जखमांनीच सजते घाव अजुनी द्या कुणी
फाटक्यां वस्त्रांस नसते फाटण्याची काळजी
लक्तरे सांभाळण्यापरि पेटवूनी द्या कुणी
साथ जीवनभर नको जी स्वार्थ जागविण्या असे
पिंड नाही देह माझा त्या मुखासी द्या कुणी
यज्ञ आरंभून सगळे व्हा सुखी जगतात या
अग्निला अपुल्या सुनेची आहुतीही द्या कुणी
राहिले उपहास माझ्या जीवनी ओथंबुनी
सवय झाली नाहण्याची, द्या.. अजूनी द्या कुणी
जिंदगी त्यांचीच इतकी बोचरी होती तरी..
मागती सांभाळण्याला बाभळी ती द्या कुणी
(अपूर्ण)
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 11/11/2008 - 14:26
Permalink
छान गझल!
हृदय जखमांनीच सजते - व्वा
सवय झाली नाहण्याची - सुंदर ओळ!
छान गझल आहे.
चमत्कारी
बुध, 12/11/2008 - 12:25
Permalink
प्रिय
प्रिय मित्र अजय,
सुंदर गझल केलीस.
शुभेच्छा!
अजय अनंत जोशी
शनि, 15/11/2008 - 20:05
Permalink
नवीन
नवीन शेर कसा वाटतो? (निळ्या अक्षरांतील)
कलोअ चूभूद्याघ्या