पहारे
होते किती पहारे
पण पोचले इशारे
ना आज भेट झाली
हे कालचे शहारे!
तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे
ते स्पर्श्,चांदण्याच्या
वर्खातले निखारे!
काया मयूर झाली
प्राणा नवे पिसारे
दोघातले गुन्हे,अन्
दोषी ऋतू बिचारे
(जयन्ता५२)
गझल:
स्मरायासारखा आता तसा मी राहिलो नाही!
कहाणी संपली माझी– जरी मी बोललो नाही!
होते किती पहारे
पण पोचले इशारे
ना आज भेट झाली
हे कालचे शहारे!
तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे
ते स्पर्श्,चांदण्याच्या
वर्खातले निखारे!
काया मयूर झाली
प्राणा नवे पिसारे
दोघातले गुन्हे,अन्
दोषी ऋतू बिचारे
(जयन्ता५२)
प्रतिसाद
कौतुक शिरोडकर
मंगळ, 11/11/2008 - 13:43
Permalink
मस्त
ना आज भेट झाली
हे कालचे शहारे!
दोघातले गुन्हे,अन्
दोषी ऋतू बिचारे
भन्नाट.
भूषण कटककर
मंगळ, 11/11/2008 - 14:22
Permalink
उत्तम!
फार म्हणजे फारच छान गझल आहे. प्रत्येक शेर उत्तम! इतक्या छोट्या वृत्तात इतका आशय मांडणे म्हणजे फार अवघड! मान गये!
नचिकेत
मंगळ, 11/11/2008 - 18:31
Permalink
असेच..
... म्हणायचे आहे. चांगली गझल!!
ज्ञानेश.
मंगळ, 11/11/2008 - 19:02
Permalink
अप्रतिम..
शब्दच नाहीत.
भुषणजींशी सहमत आहे. लहान वृत्तात गझल रचणे अवघड असते. त्यात एवढा आशय व्यक्त होणे म्हणजे...
सलाम!
अजय अनंत जोशी
शुक्र, 14/11/2008 - 12:08
Permalink
उतारे
तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे
कलोअ चूभूद्याघ्या