हुंदका उरातच गोठवायचा आहे
हुंदका उरातच गोठवायचा आहे
हा त्रास मला कोळून प्यायचा आहे
चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे
कोरंट तरी आपली फुलुन येते का
अन् तुला नवा फुलबाग घ्यायचा आहे
"नागरीक"चा एवढा अर्थ आहे की
हा देश मलाही वाचवायचा आहे
तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे
बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे
लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे
~वैवकु
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 17/04/2014 - 22:41
Permalink
चालला कुठे हा कळप झुरत
चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे
तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे
हे दोन शेर विशेष. मतलाही छान आहे. 'नागरीक'वाला शेर विशेष भावला नाही. विचार उदात्त आहे मात्र.
विजय दि. पाटील
शुक्र, 18/04/2014 - 08:56
Permalink
तो समोर ठेविल वेगवेगळ्या
तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे
मस्त. विचारांमधे अधिक स्पष्टता यावी ह्यावर काम व्हायला हवे वैभव!
कैलास
मंगळ, 29/04/2014 - 09:42
Permalink
इतक्या सुंदर गझलेवर , ''ही
इतक्या सुंदर गझलेवर , ''ही गझलच नाही '' अशी मल्लिनाथी एकाने केली आहे. माझी प्रशासकांस विनंती आहे की आपण या मल्लिनाथीवर काही भाष्य करावे. मी हा विषय अनाठायी येथे घेतो आहे,असे वाटल्यास क्षमस्व,माझा प्रतिसाद मी पुसून टाकेन.
वैभव वसंतराव कु...
मंगळ, 29/04/2014 - 17:14
Permalink
सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार
सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार
विश्वस्त
सोम, 05/05/2014 - 18:02
Permalink
ही गझल नाही असे म्हणण्यास
ही गझल नाही असे म्हणण्यास काहीही सयुक्तिक कारण दिसत नाही.
वैभव देशमुख
गुरु, 08/05/2014 - 17:46
Permalink
गझल आवडली.
गझल आवडली.
चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे
तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे
शुभानन चिंचकर
शुक्र, 09/05/2014 - 13:58
Permalink
छान आहे
छान आहे
देवेंद्र गाडेकर
शुक्र, 09/05/2014 - 14:15
Permalink
तो समोर ठेविल वेगवेगळ्या
तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे लय आवडला
बेफिकीर
शुक्र, 09/05/2014 - 14:46
Permalink
बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये
बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे
Sundar sher. Gazal aavadalee.
वैभव वसंतराव कु...
शुक्र, 09/05/2014 - 22:44
Permalink
नवीन प्रतीसादाकांचे मन:पूर्वक
नवीन प्रतीसादाकांचे मन:पूर्वक आभार