सिग्नल

उत्सव कशाचे साजरे झाले
वातावरण तर बोचरे झाले

चौकात रहदारी सुकर झाली
सिग्नल बसवला ते बरे झाले

अभ्यास काही काळिजे आता
पुष्कळ तर्‍हांचे चेहरे झाले

काही समुद्रांच्या नद्या झाल्या
काही नद्यांचेही झरे झाले

कोणास केले अलविदा आपण
की हात इतके कापरे झाले

-विजय दिनकर पाटील

गझल: 

प्रतिसाद

मतला आणि कोणास केले..हे शेर आवडले.