वाहते का ? हवाच आहे की !

वाहते का ? हवाच आहे की !
उंच उडतो ? फुगाच आहे की !

मी तुझ्यासारखाच आहे की
मी तुझा आरसाच आहे की

काय सांगू तरी तुला आता ?
सर्व काही पताच आहे की !

बनचुका तू नि बनचुका मीही
काळही बनचुकाच आहे की !

श्वास घेऊन पाहतो आहे;
भास माझा खराच आहे की...

वेगळा वेगवेगळ्या वेळी -
हा तुझा चेहराच आहे की...

नाव माझे तुझ्या सुगंधावर
एकदा नीट वाच, आहे की!

एक ही सोडली मिठी तर मग
सर्व बाकी वृथाच आहे की

ही तुझी रात्र उर्वशी आहे
दिवसही पुरुरवाच आहे की

मागतो ओठ बोलण्यासाठी
शब्द बहुधा मुकाच आहे की

खेळ हे चालले मनासंगे;
खुळखुळा चांगलाच आहे की

गझल: 

प्रतिसाद

सर्वार्थाने वेगळी गझल. अभ्यसनीय. एक ही मिठी व खेळ हे चालले मनासंगे..हे शेर आवडले.

ही तुझी रात्र उर्वशी आहे
दिवसही पुरुरवाच आहे की

सगळेच शेर मस्त , हा विशेष .

धन्यवाद. सर्व वाचकांचा आभारी आहे.