मॄत्यू अर्धविरामावस्था
अनेकदा मग असे वाटते
हे होणे आवश्यक नव्हते
यात्री बनतो प्रवास अवघा
किंबहुना मग वाटच सरते
हे कोणी केले वोडंबर
माझी तृष्णा जळते विझते
मॄत्यू अर्धविरामावस्था
रेषा रेषा जेथे जुळते
माये भिक्षा वाढुन देजो
कल्पांतीचे आले भरते....
गझल:
प्रतिसाद
कैलास
रवि, 28/02/2010 - 18:07
Permalink
मुशायर्यात सादर केल्यानंतर
मुशायर्यात सादर केल्यानंतर इथे असावी असे वाटुन मी शोधतच होतो......आपण प्रकाशित केली हे बरेच झाले...सुन्दर गझल.
डॉ.कैलास
बेफिकीर
रवि, 28/02/2010 - 20:46
Permalink
मतला अप्रतिम! सगळेच शेर
मतला अप्रतिम! सगळेच शेर आवडले. मृत्यूवरून मीरचा यानी आगे जायेंगे आठवला.
सुंदर गझल!
अजय अनंत जोशी
सोम, 01/03/2010 - 23:13
Permalink
अनंत, पहिला शेर समजतो आहे.
अनंत,
पहिला शेर समजतो आहे. बाकी डोक्यावरून...::)
प्रताप
मंगळ, 02/03/2010 - 08:07
Permalink
खुप छान. वाट आवडले.
खुप छान. वाट आवडले.
सान्जेय
गुरु, 04/03/2010 - 18:08
Permalink
भाई अनंत... गझल
भाई अनंत...
गझल आवडली
-सान्जेय
गंगाधर मुटे
गुरु, 11/03/2010 - 10:10
Permalink
छान गझल. आवडली.
छान गझल. आवडली.
चित्तरंजन भट
गुरु, 11/03/2010 - 11:32
Permalink
अनेकदा मग असे वाटते हे होणे
वा! मग मुळे मजा आली आहे.
वाव्वा! चांगली गझल. आवडली.
जयश्री अंबासकर
गुरु, 11/03/2010 - 13:48
Permalink
यात्री बनतो प्रवास
यात्री बनतो प्रवास अवघा
किंबहुना मग वाटच सरते...............मस्त मस्त !!
आवडेश :)
प्रणव.प्रि.प्र
सोम, 26/04/2010 - 12:44
Permalink
अनेकदा मग असे वाटते हे
अनेकदा मग असे वाटते
हे होणे आवश्यक नव्हते
वावा
यात्री बनतो प्रवास अवघा
किंबहुना मग वाटच सरते
अजयजी. यात्री बनतो... या शेराने ओशोची आठवण झाली....
पुलस्ति
सोम, 03/05/2010 - 22:35
Permalink
गझल आवडली! पहिले २ शेर छानच.
गझल आवडली! पहिले २ शेर छानच. पण मृत्यूचा शेर विलक्षण आहे. समजतोही...अन निसटतोही. वा वा!!
मिल्या
सोम, 31/05/2010 - 18:25
Permalink
गझल आवडली यात्री बनतो प्रवास
गझल आवडली
यात्री बनतो प्रवास अवघा
किंबहुना मग वाटच सरते >>>> व्वा