माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
हो चांगला......मी चांगला हे जाण तू
सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू
तीही पुढे भासेल चंद्रासारखी
केलीस ह्या विश्वामधे जी घाण तू
नाही तिथे पडतो असा पाऊस मी
ज्यातून येते रोप तो पाषाण तू
सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू
निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू
घेशील जितका तेवढा वाढेल तो
सैलावलेल्या चिरगुटांचा ताण तू
शरणागती घेण्यास ते होते उभे
उडवायची होतीस दाणादाण तू
जर व्हायचे नव्हते तुला माझे कधी
तर घ्यायचे होतेस माझे प्राण तू
माझ्यामुळे तू गाजली होतीस पण
लावण्य होतो मी नि माझी खाण तू
इतकेच सांगायास मी आलो इथे
थोडेतरी वात्सल्य अंगी बाण तू
समजायची ज्यांना गझल ती समजली
कर 'बेफिकिर' आता महानिर्वाण तू
-'बेफिकीर'!
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 17/06/2014 - 23:24
Permalink
सांगायचे होते......मला समजून
सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू
सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू
निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू
शरणागती घेण्यास ते होते उभे
उडवायची होतीस दाणादाण तू
वाव्वा. मस्त. चिरगुटांचा ताण वगैरे तसे सगळेच शेर खणखणीत झाले आहेत. अख्खी गझल आवडली. घाणीसाठी चंद्रापेक्षा आणखी काही वेगळे हवे होते असे वाटून गेले. अर्थात त्यामागे काही विशेष असेलच.
रुपेन्द्र
बुध, 18/06/2014 - 10:31
Permalink
माझ्यामुळे तू गाजली होतीस पण
माझ्यामुळे तू गाजली होतीस पण
लावण्य होतो मी नि माझी खाण तू
अप्रतिम.....
Akshara Surase
बुध, 18/06/2014 - 13:57
Permalink
माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
हो चांगला......मी चांगला हे जाण तू
Chaan
Milind S Joshi
गुरु, 19/06/2014 - 08:02
Permalink
नाही तिथे पडतो असा पाऊस मी
नाही तिथे पडतो असा पाऊस मी
ज्यातून येते रोप तो पाषाण तू
हा शेर सर्वात ज्यास्त आवड्ला
चाणक्य
गुरु, 19/06/2014 - 17:28
Permalink
सुंदर...
सुंदर...
जर व्हायचे नव्हते तुला माझे कधी
तर घ्यायचे होतेस माझे प्राण तू
सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू
विजय दि. पाटील
गुरु, 19/06/2014 - 20:44
Permalink
निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू
मस्त.
ज्ञानेश.
शुक्र, 20/06/2014 - 20:58
Permalink
वा...
वा...
सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू
तीही पुढे भासेल चंद्रासारखी
केलीस ह्या विश्वामधे जी घाण तू
नाही तिथे पडतो असा पाऊस मी
ज्यातून येते रोप तो पाषाण तू
निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू
हे शेर फार आवडले.
गझल आवडली.
अनंत ढवळे
शनि, 21/06/2014 - 15:22
Permalink
गझल आवडली :
गझल आवडली :
सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू
वाह वा !
सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू
माझे हे आकलन चुकीचे देखील असू शकते पण या शेरात काहीसा अडकलो - तू मला समजून घ्यायच्या आतच प्राण सोडले असा अर्थ अपेक्षित आहे बहुतेक. संबंध तोडण्यासाठी मात्र 'त्राण' हा शब्द 'धीर' या अर्थाने घेतल्यास आशयापासून थोडासा दूर जातो असे वाटले..
वैभव वसंतराव कु...
सोम, 23/06/2014 - 21:54
Permalink
सगळे शेर आवडले
सगळे शेर आवडले
समजून घे (मला) ...मी तुला सांगणारच होतो ..पण तू (माझ्यात ) तितकेही त्राण ठेवले नाहीस (माझ्याकडून तेही काढून घेतलेस )
असा अर्थ असावा असे वाटले .
supriya.jadhav7
सोम, 25/08/2014 - 11:56
Permalink
Sampurn gazal awadali !
Sampurn gazal awadali !