मागचे येतील नंतर

मागचे येतील नंतर...जा पुढे
लाव पहिला तूच नंबर...जा पुढे

लाट तू उठवू नको पाण्यावरी
शांत राहू दे सरोवर..जा पुढे

धाव जोराने, नको मागे बघू
पोच सगळ्यांच्या अगोदर.. जा पुढे

आसरा देऊ कसा, कोठे तुला ?
मी असा बेकार, बेघर...जा पुढे

जी हवी ती माणसे गेली पुढे
गाठण्या त्यांना भराभर जा पुढे

गझल: 

प्रतिसाद

मतला, सरोवर छान.

"जा पुढे" वगळून अधिक नेमकी करता येईल असे वाटले.

विजयराव, तुमची प्रतिक्रिया चिंत्य आहे. धन्यवाद.