पाहिजे तेव्हा कुणीही...

पाहिजे तेव्हा कुणीही भेटले नाही
वागणे हे जीवनाचे चांगले नाही

शेवटी हा एक साक्षात्कार झाला की,
पाहिजे तेव्हा कुणीही भेटले नाही

फायदा काही न पांगापांग झाल्यावर
लोक असताना कुणीही बोलले नाही

फक्त हसणे हे तुझे आता पुरे झाले
यामधे माझे, तुझे काही भले नाही

जाणतो मौनातले मी खेळ सगळ्यांचे
जाणतो मी, हे कुणीही जाणले नाही

गझल: 

प्रतिसाद

आवडली पण जरा कमीच

फायदा काही न पांगापांग झाल्यावर
लोक असताना कुणीही बोलले नाही

फक्त हसणे हे तुझे आता पुरे झाले
यामधे माझे, तुझे काही भले नाही

धन्यवाद दोघांनाही.

फक्त हसणे हे तुझे आता पुरे झाले
यामधे माझे, तुझे काही भले नाही
वा.

फक्त हसणे हे तुझे आता पुरे झाले
यामधे माझे, तुझे काही भले नाही

जाणतो मौनातले मी खेळ सगळ्यांचे
जाणतो मी, हे कुणीही जाणले नाही

वा ! आवडले दोन्ही.

फक्त हसणे हे तुझे आता पुरे झाले
यामधे माझे, तुझे काही भले नाही

वाह , शेर आवडला ....

धन्यवाद, सर्वांना

नवा शेर..
वाटते आहे तुला आता जसे जे जे
ते तसे तेव्हा तुला का वाटले नाही?

तिसरा आणि चाैथा आवडले जास्त. धन्यवाद

छान! शेवटचे दोन शेर विशेष आवडले!