नशेत होतो मी !
तुम्ही बोलता, नशेत होतो मी !
खरेच सांगू..?..मजेत होतो मी !
कुणीच नव्हता प्रकाश देणारा?
कश्या दिव्यांच्या सभेत होतो मी?
कुणीहि यावे, घरास फोडावे!
कधीच नाही!.. सचेत होतो मी!
नको रागवू, उगा अशी, संध्ये!
कधी उषेच्या प्रभेत होतो मी...?!
काय सांगता?...किती दिल्या हाका !
अहो,.. सखीच्या कवेत होतो मी !
वजाच केले, व्यथे, मला तू ही?!
कधी तुझ्याही जमेत होतो मी..?
दिसेल का रे, नभा, तुला शेंडा?
तुला वाटले, धरेत होतो मी!
"म्हणून तुजला वरून आदळले",
हवा म्हणाली," हवेत होतो मी "
सुधारणांचा झुगारला काढा!
किती रुढींच्या नशेत होतो मी!
कधीच नायक तिच्यातला नव्हतो;
...हरेक पानी, कथेत होतो मी!
कशास देता, अता मला अग्नी?
सबंध जीवन चितेत होतो मी!
-मानस६
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 13/07/2010 - 12:42
Permalink
तुम्ही बोलता, नशेत होतो मी
तुम्ही बोलता, नशेत होतो मी !
खरेच सांगू..?..मजेत होतो मी !
वाव्वा.
कुणीच नव्हता प्रकाश देणारा?
कश्या दिव्यांच्या सभेत होतो मी?
मस्त. फारच आवडला हा शेर.
दिसेल का रे, नभा, तुला शेंडा?
तुला वाटले, धरेत होतो मी!
वा.
एकंदर गझल अगदी चांगली झाली आहे. अभिनंदन मानस.
गंगाधर मुटे
मंगळ, 13/07/2010 - 13:15
Permalink
गझल आवडली.
गझल आवडली.
निलेश कालुवाला
मंगळ, 13/07/2010 - 14:39
Permalink
आवडली राव.....
आवडली राव.....
ह बा
मंगळ, 13/07/2010 - 16:08
Permalink
कुणीच नव्हता प्रकाश
कुणीच नव्हता प्रकाश देणारा?
कश्या दिव्यांच्या सभेत होतो मी?
कशास देता, अता मला अग्नी?
सबंध जीवन चितेत होतो मी!
सगळी गझल अल्टीमेट!
ज्ञानेश.
बुध, 14/07/2010 - 09:13
Permalink
तुम्ही बोलता, नशेत होतो मी
तुम्ही बोलता, नशेत होतो मी !
खरेच सांगू..?..मजेत होतो मी !
कुणीच नव्हता प्रकाश देणारा?
कश्या दिव्यांच्या सभेत होतो मी?
"म्हणून तुजला वरून आदळले",
हवा म्हणाली," हवेत होतो मी "
कधीच नायक तिच्यातला नव्हतो;
...हरेक पानी, कथेत होतो मी!
कशास देता, अता मला अग्नी?
सबंध जीवन चितेत होतो मी!
हे सर्व शेर सुरेख आलेत. अतिशय देखणी गझल !
अभिनंदन, मानस.
आनंदयात्री
बुध, 14/07/2010 - 14:33
Permalink
छान गझल...
छान गझल...
अच्युत
बुध, 14/07/2010 - 16:22
Permalink
तुम्ही बोलता, नशेत होतो मी
तुम्ही बोलता, नशेत होतो मी !
खरेच सांगू..?..मजेत होतो मी !
कुणीच नव्हता प्रकाश देणारा?
कश्या दिव्यांच्या सभेत होतो मी?
कुणीही यावे, घरास फोडावे!
कधीच नाही!.. सचेत होतो मी!
काय सांगता?...किती दिल्या हाका !
अहो,.. सखीच्या कवेत होतो मी !
वजाच केले, व्यथे, मला तू ही?!
कधी तुझ्याही जमेत होतो मी..?
कधीच नायक तिच्यातला नव्हतो;
...हरेक पानी, कथेत होतो मी!
कशास देता, अता मला अग्नी?
सबंध जीवन चितेत होतो मी!
गझल सुरेख, वरील शेर विशेष आवडले
मानस६
बुध, 14/07/2010 - 20:32
Permalink
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार
-मानस६
विद्यानंद हाडके
शुक्र, 17/09/2010 - 05:26
Permalink
दादा, सर्वच शेर दर्जेदार, मजा
दादा, सर्वच शेर दर्जेदार, मजा आ गया...