जे जगतो ते लिहिणारा
परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे
दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे
दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
जरा दूर जा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे
नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे
तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
-----------------------
विजय दिनकर पाटील
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 14/08/2014 - 13:04
Permalink
गझल एकंदर छान आहे. 'बरकतदायक'
गझल एकंदर छान आहे. 'बरकतदायक' हा वापर फार आवडला.
दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे
तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
विशेष आवडले. त्यातला हलकासा तिरकसपणा आवडला.
केदार पाटणकर
गुरु, 14/08/2014 - 15:27
Permalink
छान. आवडली. चित्तला आवडलेले
छान. आवडली. चित्तला आवडलेले शेर मलाही आवडले.
प्रसाद लिमये
गुरु, 14/08/2014 - 16:14
Permalink
दोघेही विश्वासाच्या दरडी
दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे
दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
दूर जा जरा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे
नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे
गझल सुंदर
यातील एखाद दुसरा सुटा शेर बहुधा फेबु वर वाचला होता.