जागरण डोळ्यांमधे आता लमाण्यासारखे नाही

जागरण डोळ्यांमधे आता लमाण्यासारखे नाही
स्वप्न आता एकही उरले पहाण्यासारखे नाही

हे म्हणत आम्ही किती अगतिक सुखाने राहतो येथे,
"राहिले आहे शहर आता रहाण्यासारखे नाही"

पाहता दिसते कुठे प्रतिबिंबही कोठे पिता येते
राहिले पाण्यामधे काहीच पाण्यासारखे नाही

मेंढरू प्रत्येक दुसऱ्या मेंढराला सांगते आहे,
"मी अलग, माझे अलाण्या वा फलाण्यासारखे नाही"

एक साधा शब्द बघतो बोलण्याची वाट केव्हाची
शब्दभर अंतर, तरी चालून जाण्यासारखे नाही

शेवटी आम्हीसुद्धा झालो बरे प्रस्थापितांपैंकी
बोलतो हल्ली किती आपण शहाण्यासारखे, नाही?

गझल: 

प्रतिसाद

गझल आवडली

शब्दभर अंतर हा शेर फार आवडला.

मेंढरू, प्रस्थापितांपैकी हे शेर वाचून मजा आली.

एक साधा शब्द बघतो बोलण्याची वाट केव्हाची
शब्दभर अंतर, तरी चालून जाण्यासारखे नाही

व्वा व्वा

गझलही मस्तच

मतला मस्त !

मेंढरू प्रत्येक दुसऱ्या मेंढराला सांगते आहे
मी अलग, माझे अलाण्या वा फलाण्यासारखे नाही>>>> वाह वा वा क्या बात !!

पाहता दिसते कुठे प्रतिबिंबही कोठे पिता येते
राहिले पाण्यामधे काहीच पाण्यासारखे नाही

वाह वा ! संपूर्ण गझल आवडली .

वा वा...अप्रतिम गझल.

हे म्हणत आम्ही किती अगतिक सुखाने राहतो येथे,
"राहिले आहे शहर आता रहाण्यासारखे नाही"

मेंढरू प्रत्येक दुसऱ्या मेंढराला सांगते आहे,
"मी अलग, माझे अलाण्या वा फलाण्यासारखे नाही"

एक साधा शब्द बघतो बोलण्याची वाट केव्हाची
शब्दभर अंतर, तरी चालून जाण्यासारखे नाही

हे तीन आवडले.

एक साधा शब्द बघतो बोलण्याची वाट केव्हाची
शब्दभर अंतर, तरी चालून जाण्यासारखे नाही

मेंढरू , प्रस्थापितांपैकी हे शेरही आवडले .

धन्यवाद .

वाह वा ! गझल आवडली .

एक साधा शब्द बघतो बोलण्याची वाट केव्हाची
शब्दभर अंतर, तरी चालून जाण्यासारखे नाही

व्वा !