गलबत कुठे निघाले
गलबत कुठे निघाले, नक्की कुणा विचारू?
पाणी सभोवताली, मी एकटा उतारु !
माझे न काम होई घालून हेलपाटे
कोणास लाच देऊ, पैसे कुणास चारू?
या धुंद लोचनांची चढली नशा अशी की,
त्यांच्यापुढे फिके हे - गांजा, अफू नि दारू
सुकले गवत म्हणाले कोमजेल्या कळीला,
'' त्या सावळ्या घनाला ये चल पुन्हा पुकारु"
आहेच मी बिलंदर, आहेस तू हरामी
दोघे मिळून आता दुनियेस या सुधारू
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 22/07/2014 - 18:36
Permalink
मतला मस्त आहे. हेलपाटे आणि
मतला मस्त आहे. 'हेलपाटे' आणि 'दोघे मिळूनही' हे शेरही सहजस्वच्छ आणि छान आहेत.
गणेशप्रसाद
मंगळ, 22/07/2014 - 19:03
Permalink
मतला खरेच अप्रतीम आहे.
मतला खरेच अप्रतीम आहे. मक्ताही छान. पण मतला सुंदरच
वैभव वसंतराव कु...
मंगळ, 22/07/2014 - 19:40
Permalink
मतला छान आहे
मतला छान आहे
शेवटचा शेरही आवडला मिस्किल वाटला गणेशप्रसादजी म्हणतात त्याप्रमाणे जर शेवटचा शेर मक्त्याचा असेल तर आपले नक्की तखल्लुस काय असेल ह्या विचारात पडलो (अर्थात दोनीही तखल्लुसे इंटरेस्टिंग तरी आपण आपल्याला जे सूट होईल ते घ्यावे )...हाहाहाहाहा ...मस्करी केली क्षमस्व !
@गणेशप्रसादजी :गझलेतल्या सहसा शेवटला शेर ज्यात शायराने आपले टोपणनाव (तखल्लुस) योजलेले असते त्याला मक्ता शेर म्हणतात अन्यथा शेवटचा शेर , आखरी शेर म्हणतात .
आपल्या तश्या उल्लेखावरून बिलंदर /हरामी ही केदारजींची तखल्लुसे असावीत असे नवख्या इसमास वाटू शकते ...हाहाहाहा ....
केदार पाटणकर
बुध, 23/07/2014 - 09:30
Permalink
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद आणि ते आवडलेही.
बेफिकीर
बुध, 30/07/2014 - 19:54
Permalink
गलबत कुठे निघाले, नक्की कुणा
गलबत कुठे निघाले, नक्की कुणा विचारू?
पाणी सभोवताली, मी एकटा उतारु !
गंगाधर मुटे
गुरु, 31/07/2014 - 13:48
Permalink
मतला, चारू आणि दारू फार
मतला, चारू आणि दारू फार आवडलेत.