गझल

मागणे संपले मागताना तुला
पोचलो  मी कुठे शोधताना तुला


दु:ख आकाश भेदून गेले पुढे
आज मी पाहिले भंगताना तुला


धर्म हा कोणता ,कोणता पंथ हा
लोक किंचाळती पूजताना तुला


ही कहाणी तुझी ,कल्पना ही  तुझी
लाज का वाटते वाचताना तुला ?


गोपुरे कंपली , पांगली पाखरे
विश्व भांबावले पाहताना तुला.....                                                     


अनंत ढवळे
गझल: 

प्रतिसाद

बदल फक्त सुचवला होता, लादलेला नव्हता. आमच्या इस्लाह ने आपणास दुखावले असल्यास क्षमस्व.



 

गोपुरे कंपली चे उत्तर महाभारतात दडले आहे .सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार.विश्वस्ताच्या  गझलांची वाट  बघतोय !
इस्लाह दुखावणारी निश्चीतच नव्हती.माझा आग्रह थोडेसे थांबून, जरासे न्याहाळुन बघण्याचा आहे , इतकेच

दु:ख आकाश भेदून गेले पुढे
आज मी पाहिले भंगताना तुला
पाहिले ऐवजी "पाहतो" असे म्हटले तर? त्याची परिणामकारकता अधिक जाणवेल असे वाटते.
ही कहाणी तुझी ,कल्पना ही  तुझी
लाज का वाटते वाचताना तुला ?
मस्त आहे!

मान्य आहे ढवळे साहेब,
राग-बिग मानू नये.

चित्तरंजनशी मी सहमत आहे

दु:ख आकाश भेदून गेले पुढे
आज मी पाहिले भंगताना तुला

शेर आवडला.