खुल्या मनाने

खुल्या मनाने हसून घे
हवे तसे तू जगून घे

झुगार संकेत, बंधनांना
हवे तसे बागडून घे

सभोवतीच्या मनामनांना
दवाप्रमाणे टिपून घे

उद्या कदाचित् नसेन मी
भरून डोळे बघून घे

करीत जा मेहनत गड्या
पगारही वाढवून घे

गझल: 

प्रतिसाद

झुगार संकेत बंधने
आणि
सभोवतीची मनेमने

... वृत्तासाठी असे बदल करावे लागतील बहुधा

संयोजकाना विनंती की एखाद्या रचनेत तांत्रिक तृटी असतील तर रचना प्रसिद्ध करण्यापूर्वी रचनाकाराशी बोलून आवश्यक ते बदल एडिट करण्यकडे जरा लक्ष पुरवावे

असो
शेवटचा शेर जास्त आवडला छान बोलकेपणा उतरला आहे

वैभवने सुचवलेले बदल योग्य आहेत.
वैभव, कित्येकदा काही ओळी गझल लिहिता लिहिता मनात ओघवत्या येऊन जातात आणि त्या अनवधानाने वापरल्या जातात. त्यातूनच अशा त्रुटी राहून जातात.

झुगार संकेत, बंधनांना
सभोवतीच्या मनामनांना
पाटणकर सहसा अशा चुका कधी करत नाहीत. असो.

उद्या कदाचित् नसेन मी
भरून डोळे बघून घे
छान.

बाकी ठीक ठीक. सुविचार.