काही नवीन सुट्टे शेरः
काही नवीन सुट्टे शेरः
================================
सुगंध शोधत असताना हे समजत नव्हते मला कधी
चाफ्याच्या वरताण घमघमे एक मोगरा घरामधे
=================================
कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते
=================================
ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना
=================================
विस्मरलेले कोणी कोणी भेटत आहे
कधी किती कोणाचा होतो समजत आहे
=================================
शेवटी केले स्वतःला माफ मी
शेवटी केलेच मन हे साफ मी
=================================
लुटले जाताना ही चिंता होती
लुटणार्याला पचेल ना ही दौलत?
=================================
रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते
=================================
त्या डोहाचा गाळ नको उपसूस कधीही
मदतीसाठी आक्रोशत बुडलेत कितीजण
=================================
सगळ्यांना समजत होते की फेकत होते सगळे
फक्त तसे म्हणण्याचे धोके टाळत होते सगळे
=================================
तुझी ती भरजरी साडी विसंगत वाटणारच ना
मुलाचे प्रेत जर ताब्यात घेण्या जायचे होते
=================================
-'बेफिकीर'!
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 04/06/2014 - 13:35
Permalink
रोज सकाळी कबूतरांना दाणे,
रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते
शेवटी केले स्वतःला माफ मी
शेवटी केलेच मन हे साफ मी
ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना
कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते
वा. हे शेर आवडले बरं का. इतरही छान आहेत.
विजय दि. पाटील
बुध, 04/06/2014 - 14:12
Permalink
कातरवेळी उदास वाटत असणे
कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते
ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना
रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते
त्या डोहाचा गाळ नको उपसूस कधीही
मदतीसाठी आक्रोशत बुडलेत कितीजण
हे शेर फार आवडले. डोहाच्या शेरातला गूढ भाव वेगळा वाटला आणि आवडलाही!
वैभव वसंतराव कु...
बुध, 04/06/2014 - 21:41
Permalink
सगळे शेर आवडले
सगळे शेर आवडले
केदार पाटणकर
गुरु, 05/06/2014 - 10:29
Permalink
ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना
=================================
विस्मरलेले कोणी कोणी भेटत आहे
कधी किती कोणाचा होतो समजत आहे
=================================
हे शेर आवडले. हे शेर असलेल्या गझला वाचायला अधिक आवडेल, असे वाटून गेले. सुट्या शेरांची संकल्पना मराठीत कशी घेतली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
आशिष सरतापे
मंगळ, 22/07/2014 - 00:02
Permalink
आवडले सर्व पण कबुतरा वरील खुप
आवडले सर्व पण कबुतरा वरील खुप छान
गणेशप्रसाद
मंगळ, 22/07/2014 - 19:54
Permalink
रोज सकाळी......, त्या डोहाचा
रोज सकाळी......, त्या डोहाचा ...., सगळ्यांना समजत...... बहुत खूब! व्वा, व्वा, सुंदर!!
विजय दि. पाटील
बुध, 23/07/2014 - 13:51
Permalink
सुट्या शेरांची संकल्पना
सुट्या शेरांची संकल्पना मराठीत कशी घेतली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.>>> मराठीत म्हणजे नेमके कोण घेणार आहे केदारराव :)
गंगाधर मुटे
गुरु, 31/07/2014 - 13:57
Permalink
रोज सकाळी कबूतरांना दाणे,
रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते
शेवटी केले स्वतःला माफ मी
शेवटी केलेच मन हे साफ मी
ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना
कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते
व्वा. मस्त आहेत हे शेर!