अफवा

मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा

काय तो ठाम घ्या आज निर्णय
काय ते आजच्या आज कळवा

दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा

सारखे वाटते मरुन जावे..
हा असा काय आलाय थकवा?

निघुन जाईल हा 'आज' सुद्धा..
काय घडले तरी काल, परवा?

'देव' ही त्यातली एक आहे..
अन अशा खूप आहेत अफवा

-उगले इंद्रजित

गझल: 

प्रतिसाद

छान, थकवा हा शेर आवडला.

मतल्यात मी 'दिशाभूल' ऐवजी 'दिशाहीन' हा शब्द वापरला असता :)

धन्यवाद :)