राहिले रे अजून श्वास किती ?*
* राहिले रे अजून श्वास किती ?
जीवनाची कथा उदास किती
दूर गेलीस तू.. निघून जरी...
दरवळे गंध... आसपास किती
चौकटीचे कुठे असे.. जगणे...
जीवनाला परीघ्-व्यास किती
गंध गेला... उडून पार जरी...
मी जपावे जुन्या फुलास किती ?
ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !
सूर माझ्यामधून... दूर अता...
आळवू मी तरी सुखास किती ?
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
केदार पाटणकर
शुक्र, 28/12/2007 - 20:54
Permalink
छान गझल
म्हात्रे साहेब,
तरही गझल छान आहे.
दुसरा, तिसरा, पाचवा शेर आवडला.
अनंत ढवळे
शनि, 29/12/2007 - 10:41
Permalink
चांगला शेर
ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !
चांगला शेर !!
चित्तरंजन भट
मंगळ, 08/01/2008 - 14:28
Permalink
मी जपावे जुन्या फुलास किती ?
गंध गेला... उडून पार जरी...
मी जपावे जुन्या फुलास किती ?
हा शेर विशेष आवडला.
कल्पना नेहमीच्या असल्या तरी ( जसे बंद द्वारे सागतास असणे, आसपास गंध दरवळणे वगैरे) तरही गझल सफाईदार झाली आहे.
पुढील गझलेसाठी शुभेच्छा!
दीपा
गुरु, 17/01/2008 - 15:11
Permalink
जगणे...
चौकटीचे कुठे असे.. जगणे...
जीवनाला परीघ-व्यास किती
व्यापक आहे...
गवि
रवि, 18/04/2010 - 15:22
Permalink
ऐकतो... पाहुण्यांस मान
ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !
क्या बात है सर.....!