सस्नेह आमंत्रण- गझल सहयोगचा गझल मुशायरा - भेटलेली माणसे

गझल सहयोग या उपक्रमातील पुढचा गझल मुशायरा 'भेटलेली माणसे' आयोजित केला जात आहे.

मुशायऱ्याचे शीर्षक - भेटलेली माणसे

दिनांक - ३ अप्रिल २०१०

वार - शनिवार

वेळ - सायंकाळी सहा ते सव्वा आठ

स्थळ - सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, ऑफ टिळक रोड, पुणे

संयोजन - अजय जोशी व बेफ़िकीर

--------------------------------------------------------------------------

गझलकारः

नवीन परिचय - श्री. नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री (पुणे) व डॉ. कैलास गायकवाड (नेरुळ)

बेफिकीर
श्री. अजय अनंत जोशी
श्री. अरूण कटारे
श्री. घनश्याम धेंडे
श्री. वैभव जोशी
डॉ. अनंत ढवळे

----------------------------------------------------------------------------

रूपरेषाः

*गझलकारांना व्यासपीठावर आमंत्रण (बेफ़िकीर)
*भटसाहेबांच्या दोन गझलांचे सादरीकरण बेफ़िकीर व श्री. अजय जोशी यांच्यातर्फे
* चक्री मुशायरा

मुशायऱ्यात सुरुवातीला आनंदयात्री व डॉ. कैलास यांच्या प्रत्येकी दोन गझला झाल्यानंतर इतर गझलकारांच्या प्रत्येकी चार गझला चक्री पद्धतीने होतील. एकंदर ३२ गझला सादर व्हाव्यात असा मानस आहे.

* कार्यक्रम समाप्ती

----------------------------------------------------------------------------

गझल सहयोगच्या मुशायऱ्यासंदर्भातील अटीः

१. सर्व गझला स्वरचित, मराठी व तंत्रशुद्ध असायला हव्यात. (संदर्भ बाराखडी)
२. गझल तरन्नुम पद्धतीने सादर केल्या जाऊ नयेत.
३. कृपया सर्व गझलकारांनी आपापल्या प्रत्येकी चार गझला दुवा क्र. १ या विरोप पत्त्यावर दिनांक ३१.०३.२०१० पर्यंत पाठवाव्यात. यातील हेतू फक्त सर्व गझला एकत्रित पद्धतीने सर्वांना मुशायऱ्यात उपलब्ध व्हाव्यात इतकाच आहे. कृपया सहकार्य करावे.
४. श्री. घनश्याम धेंडे व श्री. अरुण कटारे यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व गझलकारांच्या किमान दोन गझला अप्रकाशित व नवीन असाव्यात अशी अपेक्षा आहे. नवीन गझला होत राहणे हा मुशायऱ्याच्या मूळ हेतूंपैकी एक आहे.
५. या समारंभात कोणताही सत्कार, भाषण, मानधन वगैरे औपचारिकता नाही.
६. एक सामाजिक रचनांची फेरी असावी अशी अपेक्षा आहे, मात्र ही अट नाही.
७. मुशायरा रंगणे हा मूळ उद्देश असल्याने मुक्त शेरांची पेरणी, फर्माईश या गोष्टी गझलकारांवर अवलंबून आहेत. मुशायऱ्याचा क्रम केवळ सुसुत्रतेच्या उद्देशाने आहे हे नमूद व्हावे.

------------------------------------------------------------------------------------------

यावेळेसच्या मुशायऱ्याला प्रमुख आकर्षण म्हणून कोणालाही आमंत्रीत केलेले नाही. मागील मुशायऱ्यास उपस्थित असणाऱ्या व या मुशायऱ्यात नसणाऱ्या कवींनी सदिच्छाहेतू या मुशायऱ्याला रसिक म्हणून उपस्थित राहून शोभा वाढवल्यास आनंदच होईल.

-------------------------------------------------------------------------------------------

धन्यवाद!

-बेफिकीर'!

(भूषण कटककर - ९३७१० ८०३८७)

आगामी कार्यक्रम: 
कार्यक्रमाची तारीख: 
शनि, 03/04/2010 - 17:30

प्रतिसाद

१. सर्व गझला स्वरचित, मराठी व तंत्रशुद्ध असायला हव्यात. (संदर्भ बाराखडी)
बेफिकीर,
तंत्रशुद्धतेचा मुद्दा जरा स्पष्ट करा. म्हणजे मी त्यात बसतो की नाही हे पाहता येईल.

कार्यक्रम उत्तम आहे. नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन.
अर्थात् शनिवार (हाफ डे) असल्याने पुण्याला येऊ शकेन असं वाटतंय.
मुशायर्‍यासाठी शुभेच्छा !
----------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

माझ्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे मी स्वतः मुशायर्‍याला उपस्थित राहू शकणार नाही.

कृपया सहभागी शायरांनी याची नोंद घ्यावी. वेळेअभावी व पुरेशा प्रयत्नांअभावी मुशायरा उभा करणे शक्य न झाल्यास 'भेटलेली माणसे' हा मुशायरा जून २०१० मध्ये घेण्यात येईल.

गैरसोयीबद्दल खरच दिलगीर आहे.

क्षमस्व!

अडीअडचणी तर येतच राहणार.....त्यांवर मात करणं हेच जीवन! आपल्या आईला लवकर आराम पडो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
मुशायर्‍यासाठी सर्वांना शुभेच्छा!
मी स्वतः ८ एप्रिलपर्यंत लखनौमध्ये असल्याने उपस्थित नाही राहू शकणार!
अजयजी, ह्यावेळी १०० हून अधिक रसिक जमले पाहिजेत बरं का! बेफिकिर नसल्यामुळे तुमची जबाबदारी दुप्पट झालीय आता! :-)
खूप खूप शुभेच्छा!

आपल्या आईला लवकर बरे वाटो.....भूषणराव....वैद्यक क्षेत्रातील असल्याने मी आपल्या काही उपयोगाचा असल्यास अवश्य सांगावे.

अजयराव.....आपली जबाबदारी वाढली हे खरे.

डॉ.कैलास

नमस्कार !
बेफिकीर यांच्या आईंची तब्येत बिघडलेली असताना बेफिकीर हेही तणावात असतील. त्यावेळी मुशायर्‍याचा आनंद नेहमीइतका घेऊ शकू असे मला वाटत नाही. त्यापेक्षा हा मुशायरा पुढे ढकलला तर रास्त होईल असे वाटते. मात्र, एकदम जूनऐवजी अधे-मधे आयोजित करूया सर्वांची इच्छा असेल तर.

उत्तम......आताचा मुशायरा पुढे ढकलावा हेच बरे.

डॉ.कैलास

अजयजी व कैलासजींना अनुमोदन...

माझ्या माहितीप्रमाणे हा कार्यक्रम रद्द झाला आहे.

होय. हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागत आहे. त्याबद्दल क्षमस्व!

एक वेगळी कल्पना श्री. वैभव जोशी यांनी सुचवली आहे त्यावरही विचार चालू आहे. त्या कल्पनेप्रमाणे कार्यक्रम झाल्यास फार उपयुक्त कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

मात्र! तो मुशायरा नसेल...

बेफिकिर साहेब...जास्त उत्सुकता ताणू नका आमची.

डॉ.कैलास

खरंच सांगा आता काय होणारेय ते!
त्यावर माझं पुण्याला येणं- न येणं अवलंबून आहे...
आत्तापर्यंत परीक्षा इ. मुळे एकाही मुशाय-याला येऊ शकलो नाहीये मी!

कैलास, ऋत्विक
एवढे अधीर होऊ नका. वैभव जोशी यांनी फक्त एक कल्पना मांडली आहे. ती प्रत्यक्षात कशी आणता येईल याचा व्यवस्थित विचार करण्याचा विचार सध्या चालू आहे. अजून काहीच ठरलेले नाही. तसे काही विचार करण्याचे ठरले तर कळवूच की..!

कैलास, ऋत्विक
एवढे अधीर होऊ नका. वैभव जोशी यांनी फक्त एक कल्पना मांडली आहे. ती प्रत्यक्षात कशी आणता येईल याचा व्यवस्थित विचार करण्याचा विचार सध्या चालू आहे. अजून काहीच ठरलेले नाही. तसे काही विचार करण्याचे ठरले तर कळवूच की..!