सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगचा मुशायरा - नभाचे शब्द स्वच्छंदी
'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. गझल तिहाई च्या वृत्तांतात नमूद केल्याप्रमाणे फेब्रुवारीत मुशायरा घेण्यात येत आहे. सर्वांना मनापासून सस्नेह आमंत्रण!
तपशीलः
मुशायर्याचे शीर्षक - 'नभाचे शब्द स्वच्छंदी'
दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार
समय - सायंकाळी ६.०० ते ८.००
स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे
संयोजन - अजय जोशी व बेफिकीर
सहभागी गझलकारः
डॉ. अनंत ढवळे
श्री. मिलिंद छत्रे
श्री. केदर पाटणकर
डॉ. ज्ञानेश पाटील
श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस
श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ मधुघट
श्री. अजय जोशी
भूषण कटककर उर्फ बेफिकीर
प्रमुख आकर्षण - उर्दूचे बुजुर्ग व जानेमाने शायर - श्री. बशर नवाझ साहेब
(मी याक्षणी औरंगाबादलाच असून त्यांच्याशी भेट ठरलेली आहे. अर्थातच त्यांना आग्रहाचे निमंत्रण करणार आहे. मात्र वयामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांना येणे जमले नाही तर क्षमस्व)
कार्यक्रमाची रूपरेषा:
गझल सहयोग परिचय - २ मिनिटे
सर्व शायरांचा परिचय व व्यासपीठावर आगमन - एकंदर २ मिनिटे
बशर नवाझ सहेबांचे परिचय व आगमन - १ मिनिट
भटसाहेबांच्या २ गझलांचे वाचन - अजय जोशी व केदार पाटणकर यांच्याकडून
चक्री मुशायरा - प्रत्येकी सहा स्वरचित व मराठी गझला (प्रकाशित वा अप्रकाशित)
----------------------------------------------------------------------
ज्येष्ठ गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिकच झळाळी आली असती. तसेच श्री. चित्तरंजन व श्री. वैभव जोशी यांची काही ऑफिशियल कामे असल्याने त्यांचा सहभाग प्रत्यक्ष मुशायर्यात असण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यांचे आगमन झाल्यास अर्थातच त्यांच्याही गझलांचा आस्वाद घेता येईल. डॉ. समीर चव्हाण हे पुण्याबाहेर स्थित असल्याने त्यांच्या उपस्थितीस आम्ही मुकत आहोत. एका नवोदीत गझलकाराला संधी देण्यात येईल. यापुढील मुशायर्यांमधे ज्यांना गझल सादर करण्यासाठी आपला वेळ देणे शक्य आहे त्यांनी कृपया ९३७१०८०३८७ व ९९२३८२०८४२ यावर संपर्क करावा. याचे कारण आमच्याकडे सर्व क्रमांक उपलब्ध नाहीत. सुवर्णमयी उर्फ सोनाली जोशी, श्री, अनिरुद्ध अभ्यंकर व श्री. मिलिंद फणसे यांना कृपया वरील क्रमांकांवर संपर्क करण्याची विनंती!
या कार्यक्रमात कोणतीही भाषणे, सत्कार, मानधन, वर्गणी किंवा औपचारिकता नाही. प्रवेश विनामुल्य आहे.
तरन्नुम पद्धतीने गझल सादर केली जाणार नाही याची कृपया सहभागी शायरांनी नोंद घ्यावी.
(केदार - कृपया आपला बदललेला संचारध्वनी क्रमांक मला कळवा.)
---------------------------------------------------------------------------
सहभागी शायरांसाठी विनंती - कृपया आपल्या गझलांच्या प्रती bhushan20@hotmail.com वर दिनांक २०.०२.२०१० पर्यंत पाठवाव्यात.
शायरांसाठी गझल सादरीकरणाच्या विनम्र अटी:
१. किमान पाच शेरांच्या तंत्रशुद्धच गझला असाव्यात. (संदर्भ - बाराखडी) ) ('गझल-सहयोग' ची ही स्टँडर्ड अट आहे, यात सहभागी कवींच्या हुकुमतीवर भाष्य करायचा हेतू नाही. मात्र 'गझल-सहयोग' अशुद्ध गझलांना प्रसिद्धी देणार नाही.)
२. चक्री मुशायरा असल्याने एकावेळेस एकच गझल सादर होईल.
३. गझला लिहिलेले कागद आणल्यास त्यांचे एकत्रीकरण करून पुढे एक पुस्तिका तयार करण्याची संधी राहील. तेव्हा कृपया सर्व सहा गझला लिहूनही आणाव्यात.
धन्यवाद!
'बेफिकीर'!
प्रतिसाद
कैलास
बुध, 17/02/2010 - 18:47
Permalink
यापुढील मुशायर्यांमधे
यापुढील मुशायर्यांमधे ज्यांना गझल सादर करण्यासाठी आपला वेळ देणे शक्य आहे त्यांनी कृपया ९३७१०८०३८७ व ९९२३८२०८४२ यावर संपर्क करावा. याचे कारण आमच्याकडे सर्व क्रमांक उपलब्ध नाहीत. सुवर्णमयी उर्फ सोनाली जोशी, श्री, अनिरुद्ध अभ्यंकर व श्री. मिलिंद फणसे यांना कृपया वरील क्रमांकांवर संपर्क करण्याची विनंती!
या कार्यक्रमात कोणतीही भाषणे, सत्कार, मानधन, वर्गणी किंवा औपचारिकता नाही. प्रवेश विनामुल्य आहे.
तरन्नुम पद्धतीने गझल सादर केली जाणार नाही याची कृपया सहभागी शायरांनी नोंद घ्यावी.
(केदार - कृपया आपला बदललेला संचारध्वनी क्रमांक मला कळवा.)
---------------------------------------------------------------------------
सहभागी शायरांसाठी विनंती - कृपया आपल्या गझलांच्या प्रती bhushan20@hotmail.com वर दिनांक २०.०२.२०१० पर्यंत पाठवाव्यात.
शायरांसाठी गझल सादरीकरणाच्या विनम्र अटी:
१. किमान पाच शेरांच्या तंत्रशुद्धच गझला असाव्यात. (संदर्भ - बाराखडी) ) ('गझल-सहयोग' ची ही स्टँडर्ड अट आहे, यात सहभागी कवींच्या हुकुमतीवर भाष्य करायचा हेतू नाही. मात्र 'गझल-सहयोग' अशुद्ध गझलांना प्रसिद्धी देणार नाही.)
२. चक्री मुशायरा असल्याने एकावेळेस एकच गझल सादर होईल.
३. गझला लिहिलेले कागद आणल्यास त्यांचे एकत्रीकरण करून पुढे एक पुस्तिका तयार करण्याची संधी राहील. तेव्हा कृपया सर्व सहा गझला लिहूनही आणाव्यात.
धन्यवाद!
'बेफिकीर'!
२७ फेब्रु.च्या मुशायर्यात नवोदित शायर गझल सादर करु शकतात का?
डॉ.कैलास
बेफिकीर
बुध, 17/02/2010 - 23:40
Permalink
डॉ. कैलास
जरूर!
ती जागा अजून भरलेली नव्हती. आपल्या माहितीपैकी कुणी इच्छुक असल्यास ती जागा नोंदवू शकेन. कृपया मला त्यांच्या दोन गझला (स्वरचित, तंत्रशुद्ध व मराठी ) इमेल कराव्यात व त्या दिवशी उपस्थित त्या गझलकाराने उपस्थित राहावे.
धन्यवाद!
(गझल तंत्रशुद्ध नसल्यास बदल करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून जितक्या लवकर इमेल करता येईल तितक्या लवकर करावी. सहभागी शायरांपैकी कुणीही त्या गझलांबाबत योग्य ते मार्गदर्शन करू शकते.)
बेफिकीर
बुध, 17/02/2010 - 20:10
Permalink
फ्लॅश! बशर नवाझ साहेब येत
फ्लॅश!
बशर नवाझ साहेब येत आहेत.
सोनाली जोशी
गुरु, 18/02/2010 - 20:37
Permalink
शुभेच्छा
सध्या भारताबाहेर असल्याने प्रत्यक्ष येता येणार नाही . कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत, माहिती वाचायला, बघायला नक्कीच आवडेल.
कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि गझलेच्या प्रचाराकरता हातभार लावल्याबद्दल आभारी आहे.
सोनाली
गंगाधर मुटे
शनि, 20/02/2010 - 08:57
Permalink
शुभेच्छा.
शुभेच्छा.
बेफिकीर
सोम, 22/02/2010 - 09:41
Permalink
या कार्यक्रमात
डॉ. मिलिंद फणसेही सहभागी होत आहेत.
अजय अनंत जोशी
मंगळ, 23/02/2010 - 22:04
Permalink
गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी
गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क झाला आहे. मात्र,कार्यबाहुल्यामुळे कार्यक्रमासाठी येणे कदाचित जमणार नाही असे त्यांनी कळवले आहे. कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्ञानेश.
मंगळ, 23/02/2010 - 22:50
Permalink
तरन्नुम नाकारण्याचे काही
तरन्नुम नाकारण्याचे काही विशेष कारण?
बेफिकीर
मंगळ, 23/02/2010 - 23:34
Permalink
तरन्नुम
तरन्नुम नाकारण्याचे विशेष कारण - असे खरे तर काही नाही, पण माझ्या आजोळच्या ठिकाणी (सदाशिव पेठेत- गाडगीळ स्ट्रीटकडून शनिपाराकडे जायला लागले की) काही तरन्नुममधे गझल पेश करणारे आहेत ज्यांना मी व अजयने तीन ते चारदा ऐकल्यानंतर मग 'सूज्ञपणे' हा निर्णय घेतला.
प्रदीप कुलकर्णींशी संपर्क झाला? - कसा, कुठे, केव्हा .... अन कुणाचा?
अजय अनंत जोशी
बुध, 24/02/2010 - 08:33
Permalink
ज्ञानेश, बेफिकीर यांच्या वरील
ज्ञानेश,
बेफिकीर यांच्या वरील प्रतिसादात माझे नाव आहे म्हणून. कोण्या एका ठराविक गझलकाराचे ऐकून तरन्नूमबद्दल मी माझे मत व्यक्त केले नव्हते. माझे इतकेच म्हणणे होते की तरन्नूम मध्ये गझल म्हटल्यानंतर कमी गझला सादर होतील. प्रत्येकाला व्यवस्थित वेळ मिळणार नाही.
बेफिकीर ज्यांच्याबद्दल म्हणत आहेत त्यांचे मी अनेकदा ऐकले आहे. तसेच, अनेक गझलकार आहेत जे तरन्नूममध्ये गझल सादर करतात. अगदी बेफिकीर व माझ्यासह. तरीही एकंदर उपलब्ध वेळ पाहता हे शक्य होणार नाही असा एक साधा विचार माझ्या डोक्यात होता. तरन्नूममध्ये म्हणताना गायकीकडे जास्त कल जातो. ऐकणार्याचाही. शब्दांकडे लक्ष जात नाही. असो. यावेळी तरी तरन्नूम नको असे आमचे दोघांचेही म्हणणे आहे.
बेफिकीर,
प्रदीप कुलकर्णींशी संपर्क झाला? - कसा, कुठे, केव्हा .... अन कुणाचा?
प्रथम तुमच्या प्रश्नाचे उत्तर. श्री. प्रदीप यांना मी संपर्क केला होता त्यावर आमचे जे बोलणे झाले ते लगेच वर दिले आहे.
आता,
प्रदीप कुलकर्णींशी संपर्क झाला? - कसा, कुठे, केव्हा .... अन कुणाचा?
हा प्रश्न तुम्ही नक्की कोणाला विचारलात?
तरी,
कसा? = फोनवर
कुठे? = पुण्यात
केंव्हा? = चौकटीत दिले त्याच्या आधी
कुणाचा? = ज्याचे नाव चौकटीवर आहे त्याचा
हे विधान ज्या चौकटीत आहे त्यावर लिहिणार्याचे नाव आणि तारीख मोठ्या टाईपमध्ये दिले आहेच की....:)
कैलास
शनि, 27/02/2010 - 13:32
Permalink
कार्य बाहुल्यामुळे अन पुण्यात
कार्य बाहुल्यामुळे अन पुण्यात कार्यक्रम असल्याने प्रत्यक्ष येता येणार नाही....परंतु कार्यक्रमाविषयी ...त्याच्या यशस्वितेविषयी वाचण्यास नक्की आवडेल.....आपणांस खूप खूप शुभेच्छा.
डॉ.कैलास
कैलास
रवि, 28/02/2010 - 08:54
Permalink
कार्यबाहुल्यात थोदे शैथिल्य
कार्यबाहुल्यात थोदे शैथिल्य आल्याने जायचे जुळून आले......खूप छान मुशायरा झाला.....बेफिकिर्,अजय अनंत जोशी,मिल्या,अनंतढवळे,चित्तरण्जन भट्,ज्ञानेश्,मधुघट्,या सर्वांस इन फ्लेश पहवयास मिळले......आधी हे फोरम वरील आयकॉन म्हणून परिचित होते...असो....माझ्या ब्लॉग वर मी काढलेले फोटो अपलोड करतोय...अवश्य पहा.
डॉ.कैलास
बेफिकीर
रवि, 28/02/2010 - 12:13
Permalink
लगेच का गेलात?
कैलासराव,
आपण भेटून लगेच का निघून गेलात? मी आपल्याला विनंती करून आणखीन एक दोघांशी बोलून पुन्हा आपल्याकडे येऊ इच्छीत होतो.
असो. पुन्हा भेटूच.
कैलास
रवि, 28/02/2010 - 12:53
Permalink
येस....पुन्हा भेटूच
येस....पुन्हा भेटूच !
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
रवि, 28/02/2010 - 17:24
Permalink
भेटूच !
बेफिकिरजी,आपले निमंत्रण मिळाले होते.
येणे झाले नाही. पुढल्या वेळेस नक्की येईल.
एक उभारी उडण्याची तर पवन हात ना देते
धडपडते मन अधांतरी अन पंख साथ ना देते ..!!
श्रीवत्स
रवि, 28/02/2010 - 20:48
Permalink
मुशायरा कसा काय झाला ? यावेळी
मुशायरा कसा काय झाला ? यावेळी यूट्यूबवर चांगलं प्रक्षेपण पहायला मिळेल ही आशा !
कैलासराव तुमच्या ब्लॉगची लिंक द्या की....आम्हीही पाहू शकू.....
शक्य झाल्यास व्यक्तिंची नावे दिल्यास उत्तम !
कैलास
सोम, 01/03/2010 - 12:51
Permalink
आपण इथे पाहु शकता.. डॉ.कैलास
आपण इथे पाहु शकता..
http://www.drkailas.blogspot.com
डॉ.कैलास
केदार पाटणकर
मंगळ, 02/03/2010 - 11:10
Permalink
अभिनंदन
मुशायरा अपेक्षेप्रमाणे उत्तम झाल्याचे दिसते. अभिनंदन.
कैलास
मंगळ, 02/03/2010 - 11:44
Permalink
माझे फोटोग्राफी कौशल्य किति
माझे फोटोग्राफी कौशल्य किति वाईट आहे हे यातून दिसत आहे.....ब्याटरी गेल्याने मला जास्त फोटो घेता आले नाहीत.
डॉ.कैलास
बेफिकीर
मंगळ, 02/03/2010 - 14:27
Permalink
धन्यवाद
कैलासराव,
मनापासून धन्यवाद! आपले कौशल्यही चांगले आहेच. पण आपण मैत्रीपूर्णपणे फोटो काढल्यामुळे मला खूप आनंद झाला.
सर्वांचे धन्यवाद! वृत्तांत देत आहेच.