माझ्या चूकीची शिक्षा

जे आपले त्यांनीच हो चौघात लाजच काढली
ती कोणती जी चूक ह्या शोधात रात्रच काढली

माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली

थोबाड माझे एव्हढे का आवडे त्यांना मुळी ?
की डांबराने, द्रूष्ट ती लाडात आजच काढली

गाली खळी ती पीकदाणी, पानदानच वाटली
तोंडावरी नक्षी कशी थाटात छानच काढली

तो पूर्वजच का आठवे बघताच माझे थोबडे
'ए मर्कटा' 'मूर्खा' अशी गालात्त छानच मारली

सौंदर्य माझे देखता ते दोन पाय शिवशिवले
प्रेमात माझ्या प्रूष्ठभागी लाथ छानच मारली

त्या नग्न जीभेला किती ती धार त्यांनी लावली
ऊध्दार सा-यांचा करत बारात छानच काढली

..ही हझल म्हणता येईल का?
.. तंत्रात, अलामतीत किंवा इतर चूक असल्यास प्रकाशित करू नये.

गझल: 

प्रतिसाद

चूक लक्षात आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न करता येईल.

माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली = हा हा हा

मतल्यातील काफिया बदला.

शुभेच्छा!

ज्यांनी घराबाहेरच्या चौघात लाजच काढली
त्यांनीच माझी आज ह्या चौकात कातच काढली

माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली

थोबाड माझे एव्हढे का आवडे त्यांना मुळी ?
की डांबराने, द्रूष्ट ती गावात आजच काढली

गाली खळी ती पीकदाणी, पानदानच वाटली
तोंडावरी नक्षी कशी थाटात छानच काढली

तो पूर्वजच का आठवे बघताच माझे थोबडे
'ए मर्कटा' 'मूर्खा' अशी लाडात हाकच मारली

सौंदर्य माझे देखता ते दोन पाय शिवशिवले
प्रेमात माझ्या प्रूष्ठभागी लाथ छानच मारली

त्या नग्न जीभेला किती ती धार त्यांनी लावली
ऊध्दार सा-यांचा करत बारात छानच काढली

चूक असल्यास प्रकाशित करू नये.

बेफिकीरजी,
अजयजी,
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.