तुझ्या




आकाश भरले आज ढगानी,वाराही सुटलेला
पावसासोबती कोसळतील,विजाही परसात तुझ्या


दिवेलागणीवेळी  स्वत:ला, मी आज पेटवून घेतले
जळताना डोळे भरुन पाहीले,अन्ध या दुनीयेस तुझ्या


चावडीतल्या पारावरती,मी पाठ माझी टेकली
ती पुराणी  धर्मशाळाही,उरली नाही गावात तुझ्या


मी  धावता म्रुगजळामागे,त्यानीच मला सन्था दिली
एकही तो भ्रमर भुलणार नाही,कागदी ताटव्यास तुझ्या


चिता पेटवण्याआधी श्वास पाहण्याची,तसदी घेतली नाही कुणी
याही जन्मी जिवन्त जळलो,डोळ्यादेखत मी तुझ्या


आज सम्पेल जीवन येथे,ना सम्पेल पण ही कहानी
परीघावरचा मी प्रवासी,येईन फिरूनी  दारी तुझ्या!  




Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

कल्पना चांगल्या आहेत. मतल्यात दोन्ही ओळींत यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (असल्यास) हवेच. या रचनेत मतला दिसत नाही.  तसेच संपूर्ण गझल एकाच वृत्तात असायला हवी. ह्या रचनेबाबत असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ही रचना काही काळाने विचाराधीन ह्या विभागात हलविण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
पुन्हापुन्हा बाराखडी वाचावी. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तात गझल लिहिली जाते. वृत्तांचा अभ्यास करावा. लघू आणि गुरू म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करावा. अक्षरगण कसे पडतात किंवा मात्रा कशा मोजतात, हे देखील समजून घ्यावे. किमान एवढ्या गोष्टी गझल लिहू इच्छिणार्‍याला शिकणे आवश्यक आहे. पहिल्या दोन ओळी (मतला) निर्दोष होत नाहीत तोपर्यंत नवोदितांनी पुढे जाऊ नये.


संपादकांशी सहमत. ग़ज़लेचे तंत्र मात्र नीट अभ्यासा. एकदा ते तंत्र अंगवळणी पडले की तुमच्या हातून चांगल्या ग़ज़ला लिहून होतील याची खात्री बाळगा. नाउमेद होवू नका. तंत्राचा सराव करा. तुम्हाला असे आढळून येईल की, दिवसेंदिवस तुम्ही अधिक सफाईदार लिहू शकत आहात.
शुभेच्छा.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
 
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com