'जग मल्लीकाचे आहे' - कवी ज्ञानेशची फर्माईश!
नातू म्हणला परवाला जग मल्लीकाचे आहे
तेव्हा कळले आम्हाला जग मल्लीकाचे आहे
त्वा धोतर सोडुन आता (?) ही टृयाकप्यांट 'नेसावी'
पत्नी म्हणते नवर्याला 'जग मल्लीकाचे आहे'
गुडघ्यावरती थोडासा हा स्कर्ट घेउदे मजला
मुलगी म्हणते बापाला 'जग मल्लीकाचे आहे'
ती सत्यविनायक पूजा करण्याला बसली होती
'तात्पर्य' कळे 'गुरुज्याला' जग मल्लीकाचे आहे
जी पहिल्या पंतप्रधाने पेटवते बीडी अपुली
ती बिंबवते देशाला 'जग मल्लीकाचे आहे'
मी चातुर्मासापुरता उपवास ठेवला होता
आलिंगन देतो 'साला', जग मल्लीकाचे आहे
नुसत्याच निवडुनी आल्या या 'पार्ट्या' केव्हापासुन
सुप्रिया म्हणे बापाला 'जग मल्लीकाचे आहे'
गांधी टोपी मदतीला घेऊन देश 'मी पिळला'
सोनिया म्हणे झेंड्याला 'जग मल्लीकाचे आहे'
मी हात लावला तेव्हा, झटकून टाकला तोही
समजे अमुच्या 'अंगाला' जग मल्लीकाचे आहे
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
शुक्र, 06/11/2009 - 16:32
Permalink
नमस्कार ([सौ. गंभीर
नमस्कार ([सौ. गंभीर समीक्षा])
गंभीर समीक्षकाचा विवाह झाला की काय?
ज्ञानेश.
रवि, 08/11/2009 - 11:37
Permalink
थोडासा रोल रिव्हर्सल! नातू
थोडासा रोल रिव्हर्सल!
नातू म्हणला परवाला जग मल्लीकाचे आहे
तेव्हा कळले आम्हाला जग मल्लीकाचे आहे
कवी गंभीर समीक्षा यांची ही पहिलीच प्रकाशित रचना. याच कवीने या साईटवर याआधी एकही चांगली हझल नसल्याचा आरोप केला होता. हा हजल वाचल्यावर त्या आरोपात तथ्य असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. असो.
'मतला' साक्षात्कारी आहे. कवीच्या नातूने सांगीतल्यावर कवीला हे जग मल्लिकाचे (पक्षी: मल्लिका शेरावत) असल्याचे कळले आहे. सदर शेरात आम्हाला तरी हास्योत्पादक, विरोधाभासी, विडंबनसदृष्य असे काहीएक आढळले नाही. कवीला नातू असल्याने कवी बर्यापैकी वयस्कर असावा, एवढे कळले.
त्वा धोतर सोडुन आता (?) ही टृयाकप्यांट 'नेसावी'
पत्नी म्हणते नवर्याला 'जग मल्लीकाचे आहे'
कवीची पत्नी कवीला सांगते की हे जग मल्लिकाचे असल्याने तुम्ही धोतर सोडून आता ट्रॅक नेसत चला. आता या दोन गोष्टींचा परस्परांशी संबंध काय असे प्रश्न मनात आल्यास तो दोष तुमचा! कारण 'हझल' म्हटल्यावर काही गोष्टी आपण धरून चालाव्यात. हा शेरही हसवण्यास असमर्थ ठरतो.
गुडघ्यावरती थोडासा हा स्कर्ट घेउदे मजला
मुलगी म्हणते बापाला 'जग मल्लीकाचे आहे'
'विषया'शी संबंधीत असलेला शेर! माफक हसू आणणारा.
ती सत्यविनायक पूजा करण्याला बसली होती
'तात्पर्य' कळे 'गुरुज्याला' जग मल्लीकाचे आहे
'सत्यनारायण' पूजा आपणा सर्वांना माहिती आहे. 'सत्यविनायक' पूजा असते, ही आमच्या ज्ञानात नव्याने पडलेली भर आहे. हा शेर आमच्यासाठी बाऊंसर असल्याने याचा अर्थ कवीनेच सांगीतल्यास उत्तम.
जी पहिल्या पंतप्रधाने पेटवते बीडी अपुली
ती बिंबवते देशाला 'जग मल्लीकाचे आहे'
अजून एक बाऊंसर!
मी चातुर्मासापुरता उपवास ठेवला होता
आलिंगन देतो 'साला', जग मल्लीकाचे आहे
अजून एक!
नुसत्याच निवडुनी आल्या या 'पार्ट्या' केव्हापासुन
सुप्रिया म्हणे बापाला 'जग मल्लीकाचे आहे'
शरद पवार- सुप्रिया सुळे- मल्लिका शेरावत असा आश्चर्यकारक प्रवास करणारा शेर. गझलेत दोन ओळीत काय काय म्हणून बसवता येते, याचे उत्तम उदाहरण!
क्रिकेटच्या खेळात एका षटकात दोनापेक्षा जास्त बाऊंसर पडल्यास 'नो बॉल' समजला जातो. त्यामुळे इथून पुढचे दोन्ही शेर दखल न घेता सोडून देतो आहे.
गांधी टोपी मदतीला घेऊन देश 'मी पिळला'
सोनिया म्हणे झेंड्याला 'जग मल्लीकाचे आहे'
मी हात लावला तेव्हा, झटकून टाकला तोही
समजे अमुच्या 'अंगाला' जग मल्लीकाचे आहे
सारांश- 'गंभीर समीक्षक' या सुप्रसिद्ध आयडीची नक्कल करून बनवलेला सदर पंधरा दिवसाचा आयडी हा आमचे मित्र गंभीर समीक्षक यांचा नसावा, असा आमचा जो आधीपासूनचा संशय होता, त्याचे रूपांतर आता खात्रीमधे झाले आहे.
इति लेखनसीमा.