रू-ब-रू: गझल आणि कवितांचा कार्यक्रम
येत्या गुरूवारी- १५ ऑक्टोबर रोजी "रू-ब-रू" नावाचा संगीतबद्ध गझल आणि कवितांचा कार्यक्रम पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमात आपल्या साईटवरील गझलकार वैभव जोशी, ज्ञानेश पाटील, नीरज कुलकर्णी आणि संतोष बडगुजर यांच्या रचना सादर होणार आहेत.
नमस्कार!

सदर कार्यक्रमाला सर्व काव्यरसिकांनी उपस्थित रहावे, ही विनंती.
कार्यक्रमाचे स्थळ-
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
वेळ- सायंकाळी ६:३० ते ९.
कवी- वैभव जोशी, ज्ञानेश, नीरज कुलकर्णी आणि संतोष बडगुजर
गायक- केदार वळसंगकर
गायिका- रमा कुलकर्णी
संगीत संयोजन- निनाद सोलापूरकर
निवेदन- तेजस्विनी बापट
सर्व रसिक, कविजनांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
धन्यवाद!
प्रतिसाद
बेफिकीर
सोम, 12/10/2009 - 07:41
Permalink
हार्दिक शुभेच्छा
वैभव, ज्ञानेश, नीरज व संतोष,
सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन! आपल्या अशा स्वरुपाच्या उपक्रमातून निश्चीतच मराठी गझल लोकप्रिय होईल.
मी येणार आहे. तसेच, मीही पुण्यातच असल्याने काही मदत लागल्यास हक्काने सांगावेत.
पुन्हा शुभेच्छा! तुमच्या कोणत्या कोणत्या गझला तुम्ही कार्यक्रमासाठी निवडलेल्या आहेत ते कळवल्यास आनंद होईल.
मी आत्ताच 'गझलकार व धर्मशाळाकार 'म भा चव्हाण' यांच्याशी या विषयाबाबत बोललो. त्यांना या कार्यक्रमाबाबत ऐकून आनंद झाला. ते यायला तयार आहेत. मी त्यांना घेऊन येत आहे.
-सविनय
'बेफिकीर'!