मला येत नाही

इशार्‍यात एका कीती शब्द दडले

वाचायास डोळे, मला येत नाही

विझलेले निखारे उगी पेटवावे

तापत्या ज्वाळांचे खेळ, मला येत नाही

कितीदा सहावे मनांचे दुरावे

जिंकण्यास मनाला मला येत नाही

पुन्हा मांडलेले जुनेच खेळ सारे

तरी 'राज्य' माझे कधीच येत नाही

नवे दु:ख माझे जुन्या वेदनांचे

सुकले तरीही अश्रु पुसताच येत नाही

फुले पाहण्याचा उरला न आता छंद

पहीला सुगंध अजुनी विसरताच येत नाही.

उभा ठाकलेला आहे काळ दारी

तीच्या चेहर्‍याची ओढ जाउही देत नाही

सलिल चौधरी

www.netbhet.com

(अलखनिरंजन यांच्या "मला वेळ नाही" या गझलेपासुन प्रेरीत)

प्रतिसाद

पुन्हा मांडलेले जुनेच खेळ सारे

तरी 'राज्य' माझे कधीच येत नाही

फुले पाहण्याचा उरला न आता छंद

पहीला सुगंध अजुनी विसरताच येत नाही.

हे शेर फार आवडले ! अभिनंदन !

धन्यवाद.
माझ्या पहील्याच गझलेला मिळालेला हा प्रतीसाद आहे :-)

सलील,
गझलेला मतला असतो तो या गझलेत मला तरी दिसला नाही.
अजून याकडे विश्वस्तांचे लक्ष गेले नाही म्हणून. तरी त्यांचा निरोप तुम्हाला येईलच म्हणा.
तीन वेळा मला येत नाही असे घेतल्यावर नंतर विसरताच येत नाही, कधीच येत नाही, जाऊही देत नाही असे तंत्रदृष्ट्या चालणार नाही. गझल परिचय करून घ्या.

आशयाच्या बाबतीत काव्यरसिकाशी सहमत.

फुले पाहण्याचा उरला न आता छंद

पहीला सुगंध अजुनी विसरताच येत नाही.

एकदम सुरेख!!!!!!!!!

ही रचना विचाराधीनमधेही आहे अन मुख्य पानावरही आहे.

-बेफिकीर!