आयुष्य तेच आहे - या मक्त्यावर आधारित

"आयुष्य तेच आहे
अन हाच पेच आहे"
(या मूळ मक्त्यावर आधारित)

का शोधिसी पुन्हा तू
जे आपुलेच आहे

समजावतो मनाला
अजुनी खुळेच आहे

बिनधास्त आग लावा!
जगणे मढेच आहे...

का मागचा रडे हा?
पुढच्यास ठेच आहे

अश्रूच फक्त ताजा,
रडणे शिळेच आहे

ती भेटणार नाही
तेही बरेच आहे...

प्रतिसाद

चांगलीच आहे तरही गझल. आवडली.

जे आपुलेच आहे
रडणे शिळेच आहे
तेही बरेच आहे

हे तीनही शेर फार आवडले.
अभिनंदन!

तुम्हा दोघांनाही परत मनापासून धन्यवाद!

ती भेटणार नाही
तेही बरेच आहे...

वा! छान गझल!

जबरदस्त !