"ऋतु गजलांचे" या गझलांच्या 'सीडी'चा प्रकाशन सोहळा

"ऋतु गजलांचे" या  जयन्त कुळकर्णी लिखीत मराठी गझलांच्या 'सीडी' चा प्रकाशन सोहळा  रविवार दि. १९ जुलै २००९ रोजी गझलनवाज श्री. भीमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते डोंबिवली येथे निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

ऋतू गझलांचे


या गझलांना डॉ.आश्विन जावडेकर यांनी संगीतबध्द केले असून संगीत-संयोजन सागर टेमघरे यांचे आहेत. ह्या गझला गायल्या आहेत सुप्रसिध्द गायक  रविन्द्र साठे, पल्लवी केळकर्,विनायक लळित व आलाप जावडेकर ह्यांनी.

रविंद्र साठे गाताना





                                           

आगामी कार्यक्रम: 

प्रतिसाद

जयंतराव, तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
अजबरावांचेही अभिनंदन.
सोनाली

कवी जयंत कुलकर्णी ह्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

श्री जयन्ता ५२,

मनापासून अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!

आपल्या गझला आहेत त्याहूनही अधिक लोकप्रिय व सुप्रसिद्ध व्हाव्यात व रसिकांना काही अत्यंत अर्थपूर्ण, साध्यासोप्या भाषेतील मराठी गझलांचा आस्वाद घेता येणे शक्य व्हावे अशी माझी प्रार्थना व शुभेच्छा! तसेच, त्यातून 'मराठी गझल' या काव्यप्रकाराला एक अत्यंत महत्वाचे योगदान मिळावे अशी सदिच्छा!

मी यायचा प्रयत्न करेन. नाही येता आले तर कृपया आपला संचारध्वनी क्रमांक मला व्यक्तिगत निरोपातून कळवावात अशी विनंती!

माझा क्रमांक - ९३७१० ८०३८७

मनापासून शुभेच्छा!

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

वृत्तांत वाचायची उत्सुकता आहे.

धन्यवाद!


छायाचित्रे पाहूनच इतका आनंद झाला की..

एकंदर कार्यक्रम मस्तच झाला असणार!

श्री. जयन्तराव,

आपले पुन्हा मनापासून अभिनंदन!

मला सीडी हवी असल्यास मूल्य कुठे पाठवायचे ते कृपया कळवावेत.

( आपले सगळ्यांच हेच फोटोही उत्तम आले आहेत.)



जयंतराव, बातमी वाचून फार आनंद झाला! हार्दिक अभिनंदन आणि पु.ले.शु.!!

अभिनंदन जयन्तराव.