तिलकधारी, गप्प हो! हझल

सावजे येथे अशी की खुद शिकारी गप्प हो
गझलवन निर्बीडसे हे तिलकधारी गप्प हो


खूप श्रीमंतीत सारे, कोण मागे कर्ज रे?
हो दिवाळे, बंद कर ती सावकारी गप्प हो


दोष वृत्ताचा असो पण दोष वृत्तीचा नसो
सोड आता शायरांची वाटमारी, गप्प हो


गझलियत पाहून घेऊ आमची आम्हीच रे
तू नको शिकवूस आम्हा शिस्त सारी, गप्प हो


जीभ चाले वाकडी ज्या शायरांवर, ते तुझी
फेडण्या आलेत सारी उसनवारी, गप्प हो


हे असेही करु नये नी ते तसेही करु नये
बास झाली मसलतीची ही तुतारी, गप्प हो!


खेळकर आहेस तुज रागावणे ना शोभते
लागला का वार माझा रे जिव्हारी? गप्प हो!




 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

'हझल' असावी  ती  अशी.. फारच आवडली.
दोष वृत्ताचा असो पण दोष वृत्तीचा नसो...  खरे आहे!

पाहुया, खरच  गप्प  होतात का ते...

 

भूषण,
ठीक आहे. यापुढे तिलकधारी गप्प होईल.
कधी चुकून बोललाच तर फक्त मुद्देसूद व आवश्यक तेवढेच बोलेल.
तिलकधारी सर्वांचा मित्र आहे. तो कुणाला दुखवू इच्छीत नाही.
तिलकधारीमुळे कुणी दुखावले असल्यास तिलकधारीला माफ करा.
पण असे करू नये. ही ' हझल' नव्हे. ही 'गझल' ही नव्हे. ही फक्त एक भावना आहे जिच्यासाठी सात आठ शेर रचले आहेत.
तिलकधारीचा खुदा हाफिझ!

हझल थोडीशी अशी असते.
काढ ना तू ब्र इथे ही लोकशाही आमची
आज मंत्री कालचा कैदी फरारी, गप्प हो

आपला सात्विक संताप समजण्यासारखा आहे. सर्वांनीच सुसंस्कृतपणे या 'व्यवहारा'कडे पहावे. बाकी हेही कवीसाठी गैर नाही की,  कवितेतूनच प्रासंगिक भावना व्यक्त कराव्यात. पूर्वीपासून (अगदी मीर, गालिब..आधीपासून हे चालत आलेले आहे.) पण तरीही आपण घालून पाडून लिहिलेल्या प्रतिसादाकडे एका हद्दीपर्यंत दुर्लक्ष करावे. वास्तविक पाहता, छद्मीपणाला इथे वावच नसावा. त्यामुळे एकूण वातावरण स्वच्छंदी राहण्याऐवजी गढूळ होते. आस्वादापेक्षा कुरघोड्यांना महत्व येते. त्याची काळजी संकेतस्थळाच्या कर्त्याधर्त्यांनी घ्यावी. गझलकारांची ही एक समस्याच आहे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

वा....हझलेचा आणि प्रतिसादांचा तितकाच आनंद मिळाला.

डॉ.कैलास