तरही गझल- कसे सावरावे

ॠतू वाहणारे किती मी सहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे ।[ही ़ किरण येले यांची गझल आहे.त्यावरील तरही गझल.]


तुझ्यावीण येथे कसे मी रहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे?


सख्या सांग झाला गुन्हा कोणता रे
तुझे मौन आता कसे साहवावे?


तुझे श्वास नसता इथे आस-पास
दिव्याने असे वांझ  का फडफडावे ।


तुझ्या आठवांना क्षणी ना विसावे
कसे सांग माझ्या मना आवरावे ।


अरे कात टाकोनि आले नव्याने
नव्या या शरीरी तुला गोंदवावे ।


कुठे मागते मी सुखातील वाटा
तुझ्या आतले फक्त तू घाव द्यावे ।


असा तू,तसा तू,विदेही जसा तू
तुझ्यातुनी  मुक्त मी वावरावे ।


 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

ही गझल तरही कशी हे आपण कृपया सांगावेत.  धन्यवाद!

मी असे वाचले होते की विशिष्ट काफिया व रदीफ देऊन शायरांना शेर रचावयास सांगणे याला तरही गझल म्हणतात. तज्ञांनी दुरुस्त करावे.