आजारास कारण की...
==============
प्रिये, तू अशी साजरी राहते,
न तब्बेत माझी बरी राहते...
असा 'ताप'तो मी तुझ्या संगती,
तव्याशी जशी भाकरी राहते
कळाले मला 'बीपी ' का वाढतो,
तुझी ओढ जी अंतरी राहते
स्मृतीभ्रंश होतो तुला पाहुनी,
तुझे नाव मेंदूवरी राहते
का 'अर्धांगवायू' न व्हावा मला?
'अर्धांगिनी' ना घरी राहते !
'मधुमेह' होतो, कळाले कसा?
मनाशी तुझी माधुरी राहते..
असे व्याधीचे रूप घेवुनीया,
शरीरात माझी 'परी' राहते...!
==============
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
भूषण कटककर
शुक्र, 19/09/2008 - 13:00
Permalink
प्रतिसाद!
संकल्पना चांगली आहे. हझल आहे म्हंटल्यावर इन्ग्लीश शब्द असल्याची तक्रार करताच येत नाही. पण मनापासून सांगतो की मला फारशी आवडली नाही. त्याच्यात तुमची ' जुने, विसरून गेलेले" आणि ही हझल पाठोपाठ वाचल्यामुळे ' जुने, विसरून गेलेले'च्या तुलनेत फारच फि़की वाटली.
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 19/09/2008 - 13:08
Permalink
ही हजल आहे
पाटीलसाहेबः
ही हजल आहे असे वाटत नाही का?
बाण
शुक्र, 19/09/2008 - 13:27
Permalink
बाण हसला
बाण थोडासा हसला.
ज्ञानेश.
शनि, 20/09/2008 - 15:36
Permalink
कबूल आहे.
@भुषण साहेब्-तुमचे मत रास्त आहे. '...गेलेले' च्या तुलनेत अगदीच 'गेलेली' आहे ही हझल.
@चव्हाण साहेब- हो, ही हझलच आहे. (आय मीन, असावी) मी तरी त्याच उद्देशाने लिहिली आहे.
@बाण- आभारी आहे.
अजय अनंत जोशी
शनि, 20/09/2008 - 23:09
Permalink
प्रयत्नास दाद.
आपल्या प्रयत्नास मी दाद देतो. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
तिलकधारीकाका
बुध, 08/10/2008 - 13:00
Permalink
असे करू नये.
प्रिय मित्र ज्ञानेश?
असे करू नये.
'हझल' जरी केली तरी दोन गोष्टी फार फार महत्वाच्या असतात.
१. वृत्त - बीपी या शेरामधे वृत्ताला आजार झाल्यासारखे वाटत आहे की नाही? मला तर आधी वाटले की 'मधेच एका ठिकाणी वृत्त न सांभाळणे' हाच विनोद तुला करायचा होता.
'कळालेय बीपी कसा वाढतो' असे का नाही बरे केलेस?
२. हझल - हझल हा अत्यंत गंभीरपणे घेण्याचा प्रकार आहे. गझलेत विनोद बसवणे फार अवघड असते. सोपे शेर केले तर गझल 'चीप' वाटू शकते.
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?
[प्रतिसाद संपादित]