कैदखाना

राहिला नाही फुलांना वास थोडा;
अन् कमी झाला फुलांचा त्रास  थोडा.  

एवढ्याने माणसे झाली सुगंधी;
अत्तराचा छान होता वास  थोडा.

सोडला जेव्हा तुझा मी नाद तेव्हा;
फक्त काही दिवस झाला त्रास  थोडा.

ज्या फुलांच्या काल मी बागेत गेलो;
त्या फुलांचा रोज होतो भास  थोडा.

भाकरीचा जीव तेव्हा शांत झाला;
घातला पोटात जेव्हा घास  थोडा.

सज्जनांनी जर मला बदनाम केले;
तर कमी होईल त्याचा त्रास  थोडा.

एवढा मी गुंतलो नाही तुझ्याशी;
की, तुझा लागेल आता ध्यास  थोडा.

जीव हा गेला किती बघ शांततेने;
बोलला मज गोड जेव्हा फास  थोडा.

हा गजांचा वा फुलांचा कैदखाना;
बंधनांनी गुदमरे हा श्वास  थोडा.

                    -- अभिषेक घ. उदावंत
                      
  संवेदना रायटर्स कंम्बाईन,
                        अकोला.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

श्री.  यादगार,
प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.....!
सोडला जेव्हा तुझा मी नाद तेव्हा;
फक्त काही दिवस झाला त्रास  थोडा.

'दिवस' च्या ऐवजी  'काळ' वापरलं तर विचारांना खोली येते, दोन लघूंचा एक गुरू करावा लागत नाही. काळ ही व्याख्या सेकंदाच्या छोट्यातल्या छोट्या भागापासून अनेक वर्षांपर्यंत लावता येते. त्या मुळे एकूण किती वेळ त्रास झाला हे न सांगताच जो काही त्रास  होता (काळ मोठा असला तरी) तो  थोडा होता, कारण माझ्यात सहन करायची ताकद होती असा विचार मांडता येतो.-- यादगार

श्री.  यादगार, आपल्या विधानाच्या पुर्तते करिता ....
           झपाटलेला   (  एल्गार पान. नं. ९०)
हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला;
हरेक माणूस आज आतून फाटलेला.
अता जरी हे उदास आनंद सोबतीला;
पुन्हा पुन्हा आठ्वे मला काळ काटलेला.
                                                         --सुरेश भट
-----------------------------------

                  रिक्त          (  एल्गार पान. नं. ९९)
उगिच बोलायचे उगिच हासायचे;
उगिच कैसे तरी दिवस काढायचे.
                                        --सुरेश भट
---------------------------------------
           गुलाल आणि ईतर गझला   ( पान. नं. १४)
आजकाल वाट्ती ना मला खरे दिवस;
यायचे कधी प्रिये आपले बरे दिवस.
देह विक्रयावरी रात्र सांज भागवी;
थंड बैसला मुका काय हा करे दिवस.
                                                  -- श्रीकृष्ण राउत
श्री.  यादगार वरील शेरांमध्ये श्री. सुरेश भट व श्री. श्रीकृष्ण राउत या गझलकारांनी आपण  उपस्थित   केलेल्या ( 'दिवस' च्या ऐवजी  'काळ' वापरलं तर विचारांना खोली येते) अर्थाच्या खोली चा विचार केला नसेल काय? नक्कीच केला असेल पण,
खोलीचाच जर विचार केला तर  वरिल सर्व शेरांमध्ये काळाच्या ऐवजी दिवस व दिवसाच्या जागेवर काळ असा बदल केल्यास त्या संपूर्ण शेरातली मजा निघून जाईल व शिल्लक राहिल तो नुस्ता चोथा.
काळ आणि दिवसाची आपाआपली एक वेगळी जागा आहे. त्यांची अद्ला बदल करुन चालणार नाही.
उदा :-  जसे व्याकरणात तीन काळ प्रचलीत आहे-- भुतकाळ, वर्तमानकाळ, व भविष्यकाळ अशा वेळी आपण भुतदिवस, वर्तमानदिवस, व भविष्यदिवस असे म्हणतो का? व असे म्हणणे कितपत योग्य ठरेल, आणि तसे आपल्या कानांनाही ऐकण्याची सवयी नाही.   शेवटी काळ आणि दिवस या दोंन्ही गोष्टी आपाआपल्या ठिकाणी  आहेत. 
 

श्री.  यादगार ,
संपूर्ण रामायण सांगितल्यावर जर कुणी रामाची सिता कोण असा प्रश्न विचारत असेल तर तो रामायण सांगणा-याचा  दोष कि, ऐकणा-याचा ? प्रत्येक रचना ही एक आपली स्वःताची ओळख घेउन येते . जर त्यात एखादा शेर कमी ताकदीचा वाटत असेल तर तो तसाच बाजूला ठेवावा (जोपर्यत चांगली कल्पना सुचत नाही तोपर्यत )किंवा काढुन टाकावा. ईतरांचा सल्ला घेवुन जर गझल बनवायची म्ह्टले तर गझल संग्रह काढायला जास्त वेळ लागणार नाही. आणि त्या गझल संग्रहाचे प्रातिनिधीक गझल संग्रह असे नामकरण करावे कि, वयक्तिक हा आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होईल.
* रचना आवडली नाही आवडली  याबाबत व्यक्तिशा प्रत्येकाने आपले परखड मत     मांडावे याबाबत दुमत नाही .

यादगार महोदय,

* माझा 'असा' काही गोड गैर समज झालेला नाही की - मराठीतल्या प्रत्येक गझलेतून तुम्ही 'दिवस' हा शब्द काढायला सांगितला आहे आणि त्या ऐवजी काळ हा शब्द टाकण्यास सांगितला आहे. :)) पण मला वाटते की चर्चा करून फायदा होतो. शिवाय मी *हल्ली गझल लिहितच नाही त्यामुळे कुणी माझ्या गझला किंवा गझल संग्रह लाटेल अशी भिती पण नाही मला.

कै. भटांच्या दुसर्‍या अनेक गझलातून 'दिवस' हा शब्द आहे.
{ मला वाटले होते की सगळीच उदाहरणे सांगितली जाणार की काय पान क्रमांका सह !! :)) एकदम दांडगे आहे बुवा पाठांतर }
--------- *---------*--------- *---------*--------- *---------*

सोडला जेव्हा तुझा मी नाद तेव्हा;
फक्त काही दिवस झाला त्रास थोडा.
बदल : (फक्त काही काळ झाला त्रास थोडा.)

मला हे माहित आहे की 'काळ' या शब्दाचा बदल तुम्ही फक्त अभिशेक उदावंत यांच्या उपरोक्त एका शेरा साठीच सांगितला होता.
पण तुम्ही मला हे सांगा की अभिशेक उदावंत यांनी दिलेल्या इतर उदाहरणात 'दिवस' हा शब्द का आला आहे आणि या इथेच उपरोक्त शेरात 'काळ' हा शब्द तुम्ही का सुचवला ? . बघू तरी तुम्ही काय सांगता ते? जेव्हा तुम्ही योग्य जागी योग्य शब्द योजायला सांगता तेव्हा काही मंडळी तुम्हालाच तुमची जागा दाखवायचा प्रयत्न करतात. असते अशी सवय असते लोकांना, सवय ---- असो---

यादगार तुम्ही म्हणाला होतात या मुद्यावर आधी बरीच उहापोह झाली होती. नेमके काय ते सांगा बघू जरा. मलाही उत्सुकता आहे.

****विश्वस्त महोदय ही चर्चा अभिशेक उदावंत यांच्या याच गझले बाबत आहे तेव्हा ती इथेच कारावी हे योग्य आहे अन्यथा आम्हाला उगीच एक नवे चर्चा सत्र सुरु करावे लागेल. परंतू यादगार व मी ; इथे ही चर्चा करणे अप्रस्तुत वाट्त असेल हा तर प्रतिसाद काढून टाकण्या आधी मला निदान कळवायची तसदी घ्यावी. परत परत हे टंकलेखन कोण करणार ? ****

>> गझलेत काय शब्द योजावेत या पेक्षा काय शब्द योजू नयेत याला जास्त महत्व आहे.

क्या बात है ? यादगार साहेब. मान गये. इतका ंमोठा व मुद्देसूद प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद. तुमचे उपरोक्त विधान सत्य आहे व ते तुम्ही स्वतः मान्य करता--- फक्त बोलत नाही.
याचा पुरावा हा आहे की मी तुम्हाला *त्याग या तुमच्या गझलेच्या २ शेरातले सुचवलेले बदल तुम्ही मान्य केले होते. दुसर्‍याही एका गझलेतला मी सुचवलेला बदल तुम्ही मान्य केलात; तो देखील गझल संग्रहात कुणाचे नाव द्यायचे, प्रातिनिधिक गझल संग्रह की वैयक्तिक गझल संग्रह इत्यादी बालिश मुद्दे उपस्थित न करता !!

पण यादगार साहेब, मला एक प्रश्न पडतोय की तुम्ही इतक्या बारकाईने मुद्दे समजावलेत पण कुणाची समजावून घेण्याची तयारीच नसेल तर याचा काय उपयोग ? तुम्ही फक्त एका शब्दासाठी हा जो इतका बारकाईने विचार केलात तितका मी पण केला नव्हता.

एकंदरीत अभिशेक उदावंत यांनी नुसतीच उदाहरणे दिली पण त्यातील योजलेल्या 'दिवस' व 'काळ' या शब्दांचे नेमके प्रयोजन काय याचा विचारच केलेला दिसत नाही.

चांगला शेर आहे...बाकीची चर्चा नेहमी प्रमाणे  उद्बोधक आणि ज्ञानवर्धक  !!

श्री.  यादगार ,
                      आपण काय हातामध्ये स्केल पट्टी घेवुन जणु गझलची तंतोतंत लांबी रुंदि मोजण्याच काम हाती घेतलं की, काय ? अशी आता शंका वाटू लागली आहे.( सोचो तो कुछ बडा सोचो) उगिच .......आपली सहज गंम्मत केली........
आता मुळ मुद्द्यावर येवू....
१)कै. भटांच्या पहिल्या शेरात काफिया 'काढायचे' असल्याने 'काळ काढायचे ' असे विधान होऊच शकत नाही . 'काळ काढायचे' असे  विधान केले  तर  ते अनेकवचनी अर्था प्रमाणे प्रतीत होईल व तो वर्तमान, भूत, भविष्य अशा ३ वेगवेगळ्या काळांचा विषय येईल.  म्हणूनच या इथे दिवस हा शब्द वापरलेला आहे जो काफियाशी  व व्याकरणाच्या  नजरेतून सुसंगत आहे.  इथे कसे बसे दिवस काढणे हा वाकप्रचार वेगळी शब्द रचना करून वापरलेला आहे,  कसं जसं जमेल तसं (किंवा नाही जमलं तरी) मजबूरीने जागायचं असा अर्थ अभिप्रेत आहे.जर  या ठिकाणी दिवस हा शब्द आला नसता तर मग मी  नक्कीच बदल सुचवला असता व त्यात  दिवस हाच शब्द बदल म्हणून सुचवला असता. अर्थातच कै. सुरेश भटांना मी असे बदल सुचवायची गरजच पडली नसती हा मुद्दा वेगळाच आहे.
कै. भटांच्या दुसर्‍या शेरात काळ  हा शब्द काफियाच्या कक्षेत आहेच. पण तिथे दिवस वापरून चालणार नाही कारण काळ हा शब्द  इथे भूतकाळातील कटलेला कालावधी ( some period  of past) या अर्थाने वापरला आहे. इथे काटलेला दिवस  असे म्हटले तर ते (एकवचनी )१ दिवस असे वाटेल.

२) राउतांचा पहिला शेर बघा - या गझलेत  दिवस हा शब्दच रदीफ आहे.  तिथे देखील काफियाशी सुसंगत असा शब्द असल्याने तो योजलेला आहे  . 'खरे  काळ '  असे कुणीच म्हणणार नाही . या शिवाय मतल्यावरून व पुढच्या एका शेरावरून असं दिसतं की  मिसर्‍याच्या अगदी शेवटी  अनुक्रमे १ लघू  १गुरू आहेत. ज्यात काळ हा शब्द बसत नाही. कारण त्याच्या मात्रा अनुक्रमे १ गुरू १ लघू आहेत. पण दिवस  या शब्दाच्या ३ लघू  मात्रा असल्याने   त्या  १ लघू   १गुरू या क्रमाने विचारात घेता येतात.  
राउतांचा दुसरा शेर बघा- तिथे दिवस रात्र हे शब्द अनुक्रमे - २४ तासातील उजेडाचा वेळ व २४ तासातील काळोखाचा वेळ या अर्थाने वापरले आहेत. म्हणजे तिथे शब्द छ्टेच्या अनुषंगानेही  दिवस हाच शब्द हवा जो रदीफही आहेच. एकंदरीत उपरोक्त  उदाहरणात दिवस हा शब्द काफिया रदिफाच्या कक्षेतला शब्द आहे. जो शब्द छटेचा अर्थ तसंच गझलेच्या व्याकरणाच्या  अनुषंगानेही बदलून चालणार नाही.
याबाबत आपले वरिल मत आहे तर माझ्या ह्या शेराबाबत वेगळे मत का आहे.?
आता अभिशेक उदावंत यांचा तो शेर बघू
सोडला जेव्हा तुझा मी नाद तेव्हा;
फक्त काही दिवस झाला त्रास  थोडा.
(फक्त काही काळ झाला त्रास  थोडा.)


१)  अभिशेक उदावंत यांच्या शेरात  दिवस  हा शब्द काफिया-रदिफाच्या कक्षेत येत नाही.  म्हणून त्या शेरात "दिवस"  चा  "काळ"  केल्यास काफिया रदीफावर काहीच फरक पडणार नाही.  
२) अभिशेक उदावंत यांच्या शेरात गालगागा गालगागा गालगागा या वृत्तात दिवस ऐवजी काळ  हा शब्द चपखल बसतो कारण त्यामुळे दोन लघूंचा एक गुरू करावा लागत नाही. ३) माझ्या  मते  अभिशेक उदावंत यांच्या शेरात  "काही दिवस" हा  शब्द प्रयोग "काही वेळ" या अर्थाने वापरलेला आहे म्हणून तिथे "काही दिवस"(some days)  ऐवजी "काही काळ" ( some period  )  हा शब्द प्रयोग योग्य आहे. कारण शब्द छ्टेच्या अनुषंगाने काळ या शब्दाला जास्त वैचारिक खोली आहे व शब्द छ्टेच्या अनुषंगाने  'दिवस' चा अर्थ वेगळा आहे. -यादगार
जर आपले वरिल शेराबाबत हे मत आहे तर पुढील शेराबाबत काय सांगता येईल...
एल्गार   ( पान नं. ४७)
येणारा दिवस मला हेटाळत हसणारच;
जाणारा दिवस मला जातांना डसणारच.
वरवरच्या बोलण्यात गेली बघ सरुन रात्र;
मावळता चंद्र तुझे नाव मला पुसणारच.
                                                    --सुरेश भट
दुसरे असे कि,.....
जिस दिन से चला हु मेरी मंजिल पे नजर है!
आखो ने कभी मिल का पत्थर नही देखा.
घर अकेला हो गया      ( पान नं. १३३)     
उअस दिन से बहुत तेज हवा चलने लगी है!
बस मैने चिरागो की तरफ देख लिया था.
                                                      --मुनव्वर राना
      घर अकेला हो गया           ( पान नं.१९६)     
अपनी यादो से कहो एक दिन की छुट्टी दे मुझे!
इश्क के हिस्से मे भी इतवार होना चाहीए.
                                                       --मुनव्वर राना
साये मे धूप           ( पान नं.४३)    
आपके कालीन देखेंगे किसी दिन!
इस समय तो पाव कीचड मे सने है.
                                               --दुष्यंतकुमार
साये मे धूप           ( पान नं.५७)   
खास सडके बंद है तबसे मरम्मत के लिए!
ये हमारे वक्त की सबसे सही पहचान है.
                                                  --दुष्यंतकुमार
वरील शेरांमध्ये दिवस्/दिन आणि काळ/ वक्त हे एक कालावधी मोजण्याच परिमाण (सुचक) आहे त्यांचा शब्द्शः अर्थ घेणे  येथे योग्य ठरणार नाही.
 
राउतांचा दुसरा शेर बघा- तिथे दिवस रात्र हे शब्द अनुक्रमे - २४ तासातील उजेडाचा वेळ व २४ तासातील काळोखाचा वेळ या अर्थाने वापरले आहेत. म्हणजे तिथे शब्द छ्टेच्या अनुषंगानेही  दिवस हाच शब्द हवा जो रदीफही आहेच.- यादगार.
यादगार आपल्या वरिल विधानाचा जर विचार केला तर...
जिस दिन से चला हु मेरी मंजिल पे नजर है!
आखो ने कभी मिल का पत्थर नही देखा.

वरील विधानात ज्या २४ तासापासुन मी घरातुन निघालो तेव्हापासुन माझा लक्षावर डोळा आहे असा अर्थ घ्यायचा काय किंवा...
उदा.  आता कुठे आपले चार दिवस सुखाचे आले .म्हणजेच (आता दुखः संपुण सुखाचे दिवस आले आहे. )ह्या सहज वापरावयाच्या शब्दाचा  शब्द्शःअर्थ घ्यायचा झाल्यास
आता कुठे आपले ९६ तास सुखाचे आले (एक दिवस म्हणजे २४ तास तर २४ गुणीले ४ = ९६ तास) असा शब्दशः अर्थ घ्यायचा काय ?हेच वाक्य वरिल सर्व शेरांबाबत लागू आहे.

यादगार महोदय,
आपण मराठी गझले बाबत बोलत होतो. इथे गाडी बघा हळू हळू उर्दू - हिंदी रुळावर जाते आहे.
आणि आता सज्जड पुरावाच मिळाला आहे. माझा संशय खरा ठरला. आपण म्हटला तसा गोड गैरसमज झालेला आहे . खरे म्हणजे गोड गैरसमज वाढलेला देखील आहे दिसत . म्हणजे उर्दू हिंदी गझलेतही तुम्ही *काळ आणि *दिवस हे शब्द टाकायला सांगितले असा वाढीव गोड गैर समज झालेला आहे. किंवा विपर्यास तरी आहे.

"आता कुठे आपले चार दिवस सुखाचे आले " इथे काळ या अर्थाने "दिवस" हा शब्द बहुवचनी वापरला आहे . पण तिथे काहीसे मोजमाप दिले आहे 'चार दिवस' म्हणजे थोडा काळ अशा अर्थाने आहे ते वापरले आहे. काही काळ आणि त्यात खूप फरक आहे. पण यादगार पंत , वाचन केले आणि अर्थ समजले असतील तरच हे कळ्ते नाही तर पुस्तकी मालगाड्या कितीही शब्द टाकून लांब करता येतात.
यादगार तुम्ही सुचवलेला बदल फक्त उपरोक्त गझलेतल्या शेरासाठीच आहे- हे अजून लक्षातच आलेले दिसत नाही स्वारीच्या. तुम्हालाच उलटा प्रश्न विचारलाय की "रामाची सीता कोण ?", "दोष कुणाचा " ? इत्यादी.
*शेवटी शेवटी तर गाडी गणिताच्या रुळावरून विपर्यासाच्या स्थानकावर भरकटत गेली आहे.
यादगार पंत, मी याच साठी म्हणालो होतो. की तुम्ही समजावून दिले तरी समजून घेणारेही कमीच आणि समजून घ्यायची कुवत असलेलेही कमीच आहेत. सर्वात आधी तुमचे प्रतिसाद बारकाईने आणि विचार पूर्वक वाचले जातात की नाही ? हाच माझा सवाल आहे. "समोरच्याला काही तरी उत्तर देऊन गप्प करून टकू म्हणजे मी योग्य आहे सिध्द होईल" असे काही तरी गृहीत धरून बरेचदा प्रतिसाद दिले जातात असे एकंदरित दिसते आहे.
हे मला माहीत आहे की तुम्ही पुन्हा सगळ्या शेरात वापरलेल्या शब्दांचं प्रयोजन काय आहे ते समजावू शकता. पण समोरच्याला ते मान्यच करायचं नसेल आणि "मीच योग्य आहे" हे सांगण्यासाठी विपर्यास करायचा असेल तर मग काय उपयोग आहे तुम्ही समजावून ?
यादगार पंत तुमचा संयम बराच आहे हे देखील मी जाणतो. पण तो संयम असा वाया घालवू नये ही विनंती.

एवढ्याने माणसे झाली सुगंधी;
अत्तराचा छान होता वास  थोडा.
सज्जनांनी जर मला बदनाम केले;
तर कमी होईल त्याचा त्रास  थोडा.

सौ नक्कल वहिनी, आलाच आहात तर वरील शेरांचे रसग्रहणही करून जा.छान शेर आहेत.

ज्या फुलांच्या काल मी बागेत गेलो;
त्या फुलांचा रोज होतो भास  थोडा.

छान.