मतितार्थ सारी शायरी

लाडके रचली तुझ्या प्रीत्यर्थ सारी शायरी
हे तुझे रुसणे करी बिनअर्थ सारी शायरी


माणसामध्ये मी यावे नीट वागावे जरा
करत हरते प्रयत्नांची शर्थ सारी शायरी


रिझविण्या हृदयास तुमच्या वेळ ह्क्काचा दिला
मूल्य कोठे घेतले परमार्थ सारी शायरी


या युगाचा व्हायला 'गालीब' लाखो झुंजले
रसिक ना त्या ताकदीचा व्यर्थ सारी शायरी


देह चालवण्यास आहे नोकरी मजला जरी
या मनाचा चालवी चरितार्थ सारी शायरी


अस्थि माझ्या घ्यायला ते पोचले दुसर्‍या दिनी
तप्त कविता गवसल्या मतितार्थ सारी शायरी

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

अलामत मार खाते आहे. मतल्यात 'अर्थ' अशी अलामत नक्की झाली आहे. परमार्थ, मतितार्थ, चरितार्थ असे काफिये पुढे चालणार नाहीत. पण Bhushan Katakkar यांनी गझलेचा ध्यास घेतला आहे असे दिसते. त्यामुळे माझ्या अपेक्षा वाढत आहेत.
अलामतीचे व्याकरण सुरेभट.इन वर दिलेले आहे. कुठे ते आठवत नाही.

अलामत विषय सोडून द्या. पण चांगली गझल.