काही नाचतात मृत्यू......

" काही नाचतात मॄत्यू घेउनि हातात मॄत्यू     
  विसरले कोवळीक माणसाची का होउनी दिवाणे  ?


  हा रंग आणि गंध कधी होताच त्यांच्या अंतरी
  आज पेरतो वाटेत त्याच्या काटेकूटे नि वणवे...

  किती लांबला रस्ता किती लांबले तराणे,
  काहिच गोम कळेना फक्त कोडे आणि उखाणे...

  भुंकतात भुंकणारे झिंगतात झिंगणारे
  ओशाळले किती इथे असे महात्मे पुराणे..?

  मेघांत दाटलेले अन् डोळ्यांत साठलेले
  थेंब जिवनाचे मग् नाव का निराळे..?

  जाणिव करुन देतो 'ईश्वराची' पाषाण तो शेंदुरी
  तर दंडवत घालावया का मागेपुढे पहावे...?

  माणुस नेहमीचा हा वाहतो स्वभावे 
  कधी फिरतील पावले त्याची पुन्हा घराकडे नव्याने  .....? "
  

  
 



  
 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

हिला गझल म्हणणे धारिष्ट्य होईल...
-मानस६

वरील रचना गझल म्हणता येणार नाही. काही काळाने वरील रचना विचाराधीन विभागात हलविण्यात येईल, ह्याची नोंद घ्यावी ही विनंती.