कवीमन चौकटी मानणार नाही
** कवीमन चौकटी मानणार नाही **
कविता काही गझल रचणार नाही
भाव मी अंकात मोजणार नाही
शब्दांना बांधा तुम्ही नियमाने
संवेदना मी करकचणार नाही
नका दाखवू शब्द घाव तुम्ही
तुडवलेलं फुल मी लपवणार नाही
तोला रे तुम्ही शब्दांची खोली
तराजूत मी मन तोलणार नाही
रेखाटा तुम्ही शब्द आकॄत्या
भू हे आकाश चित्र गिळणार नाही
रोखा रे तुम्ही शब्द लाटांना
उरीचा झरा मी अडवणार नाही
कुपीत भरा तुम्ही शब्द केवडा
मन सुगंध मी कैद करणार नाही
लखलाभ तुम्हांलाच झापड तांडे
कवीमन चौकटी मानणार नाही
- स्वप्ना
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
संपादक
सोम, 24/09/2007 - 16:20
Permalink
वृत्ताचा अभ्यास करावा
वृत्ताचा आणि छंदाचा अभ्यास करावा. विचार, कल्पना छान आहेत. फक्त त्या एका छंदात, वृत्तात यायला हव्यात. इथला वेचक छंदविचार ह्या लेख वाचून काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. लेख वाचून झाल्यावर आपल्या वरील रचनेवर पुन्हा एकदा विचार करा. समजण्यात काही अडचण आल्यास प्रश्न विचारा. इथले सदस्य कुवतीप्रमाणे उत्तरे देण्याचा शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतीलच.
संतोष कुलकर्णी
मंगळ, 25/09/2007 - 18:00
Permalink
नो नो नो
क्षमस्व. गझल नाहीच. भाव ठीकच. पण ... वूत्तांची माहिती हवी.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
स्वप्ना
मंगळ, 25/09/2007 - 18:24
Permalink
उदाहरण द्या
वॄत्त कुठे चुकले आहे याचे ह्या गझलमध्ये आपण उदाहरण देऊ शकाल काय ? म्हणजे मला सुधारणा करता येईल