सार्याच्या बगलेत...
सार्याच्या बगलेत छुपे खन्जीर,
इथे कुणीही साव नाही.
फावल्या वेळी जल्लाद सारे,
इथे भावनेस वाव नाही.
दुनीयेच्या बाजाराची,
ही रीतच आहे वेगळी.
सर्वाना हव्या पाकळ्या इथे,
फुलाना मात्र भाव नाही.
डोळ्यास पाणी लावणे,
कधीच ना जमले मला.
तेव्हाही ते अश्रु होते,
हाही रडण्याचा बनाव नाही.
आता कुठे जावून मी,
मोकळ्या हवेत श्वास घेऊ?
टाकले ना जिथे वाळीत मजला,
असा एकही गाव नाही.
त्याच्या मुरलीचे भास राधे,
श्वास बनवून घे आता.
सूराविना त्या झन्कारण्याचा,
ह्रदयास तुझ्या सराव नाही..
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
Sunil Deshmukh
मंगळ, 28/08/2007 - 16:20
Permalink
सार्याच्या बगलेत...
मस्त, आवडली
सार्याच्या बगलेत छुपे खन्जीर,
इथे कुणीही साव नाही.
फावल्या वेळी जल्लाद सारे,
इथे भावनेस वाव नाही.
सुन्दर कल्पना