तुझी नजर

मायबोलीवर कैलास गायकवाड ह्यांनी दिलेल्या

'खोल खोल आतवर तुझी नजर' ह्या मिसर्‍यावर रचलेली गझल

खोल खोल आतवर तुझी नजर
काळजास पाडते अजून घर

एवढा उगाच का चढेल ज्वर?
खोल खोल आतवर तुझी नजर

घाव हा तुझा तसा जुनाच पण
आजही जखम तशीच... ओलसर

एक तर उधार चेहरा तुझा
त्यात लिंपले थरांवरून थर

सांग ना सुगंध हा लपेल का?
आणतो कुठूनही तुझी खबर

तप्त अन उजाड वाळवंट मी
दे तुझेच मेघ अन तुझीच सर

रंगहीन वस्त्र जीवना तुझे
दु:ख त्यावरी करे कलाकुसर

घ्यायचे असेल तर कवेत घे
पण नकोच स्पर्श हे सटरफटर

मी तुला हवा तसा दिसेन पण
आरसा जरा स्वत:समोर धर

श्वास तो शिधा म्हणून वाटतो
नवल काय जर असेल त्यांत खर

दु:ख फार तर असेल वीतभर
पाहिजे रुमाल मात्र हातभर

प्रतिसाद

रंगहीन वस्त्र जीवना तुझे
दु:ख त्यावरी करे कलाकुसर ..... क्या बात है साहब

मी तुला हवा तसा दिसेन पण
आरसा जरा स्वत:समोर धर ..... सुंदरच

घ्यायचे असेल तर कवेत घे
पण नकोच स्पर्श हे सटरफटर
वा ! कया बात

घ्यायचे असेल तर कवेत घे
पण नकोच स्पर्श हे सटरफटर
वा ! कया बात