थांबणे सोसेल तोवर लागते चालायला....
श्वास माझे सांगती मी पाहिजे थांबायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला
पाहिले होते तुला आलीस मग स्वप्नात तू
स्वप्नपुर्ती ध्येय झाले लागले जागायला
घेतले जेव्हा कडेवर "पांगळे" से दुखः मी
ते पहा ना ! सूख माझे लागले रांगायला
लागला मतितार्थ गीतेचा मला "तो" - हा - असा
भोग सारे भोगतो मी ! "या जगातच" यायला
आरसा पाहून घे ! तू - पत्रिका पाहू नको
शेवटी होतेच "ते" - वाटे - नको ! "जे" व्हायला
कायद्याची थोरवी कोणीच नाही गायली
कायद्याच्या आडवाटा लागल्या सांगायला
मयुरेश साने...दि..१८-फेब-११
गझल:
प्रतिसाद
विद्यानंद हाडके
शनि, 19/02/2011 - 18:41
Permalink
घेतले जेव्हा कडेवर "पांगळे"
घेतले जेव्हा कडेवर "पांगळे" से दुखः मी
ते पहा ना ! सूख माझे लागले रांगायला
मयुरेश, बहोत सुंदर
सारंग_रामकुमार
रवि, 20/02/2011 - 23:51
Permalink
विद्यानंदजी, मुंह की बात छिन
विद्यानंदजी,
मुंह की बात छिन ली!
रामकुमार