आल्या सजून राती....

आल्या सजून राती....

स्पर्शात चांदण्यांच्या आल्या सजून राती !
देहातले दुरावे गेल्या त्यजून राती !!

हातात हात घेता,एकांत कंप पावे,
आधार तव मिठीचा घेती धजून राती !!

कल्लोळ भावनांचे ओठांवरी उमटता,
गंधाळल्या क्षणांच्या साक्षी अजून राती !!

व्याकूळते अजूनी अंगांग समर्पणासी,
माळून श्वास ताजे नटल्यात जून राती !!

स्वर्गातल्या सुखांची ना वानवा उरावी,
मन्मंदिरी प्रियेला गेल्या भजून राती !!

-सुप्रिया (जोशी) जाधव.

प्रतिसाद

कल्लोळ भावनांचे ओठांवरी उमटता,
गंधाळल्या क्षणांच्या साक्षी अजून राती

आवडला..!

माळून श्वास ताजे नटल्यात जून राती >>> व्वा! ओळ फारच सुंदर!

त्या शेरात अंगांग ऐवजी काया केल्यास वृत्तात बसावे.

बाकी गझल जरा नक्षीदार वाटली.

धन्यवाद!

कल्लोळ भावनांचे ओठांवरी उमटता,
गंधाळल्या क्षणांच्या साक्षी अजून राती

छानच ..