बोलू नकोस काही
बोलू नकोस काही - समजून घे इशारे !
ये ना मिठीत माझ्या ! दे अंगावरी शहारे !
रेंगाळते कशाला ? ये ना ! निघून आता !
विझवून जा उरीचे - ते श्वास पेटणारे !
अत्ता मला समजले का ? फुलती कळ्या खुळ्या !
भेटीस सज्ज अपुल्या झाले गुलाब सारे !
चंद्रा तुला आता मी - दावेन पौर्णिमा !
म्हणशील "कोजागिरी" ला - "पेटते निखारे" !
आल्या नटून रात्री - बेधुंद गार वारा !
डोळ्यास पापणीचे - बघ जागते पहारे !
.............. मयुरेश साने ...दि.१२-फेब-११
गझल:
प्रतिसाद
मी अभिजीत
सोम, 14/02/2011 - 14:37
Permalink
१ल्या आणि ४थ्या शेरात
१ल्या आणि ४थ्या शेरात मात्रांची गडबड वाटते आहे.
supriya.jadhav7
मंगळ, 15/02/2011 - 08:26
Permalink
अभिजीतशी सहमत.
अभिजीतशी सहमत.