तुझा दोष नाही !!!

तुझा दोष नाही !!!

तुझ्यासारखे बघ, मलाही सुखाने जगाया न आले, तुझा दोष नाही !
तुझी होत होता, कधीही सख्या मग कुणाची न झाले, तुझा दोष नाही !!

पहाटे पहाटे धुके दाटलेल्या सराईत वाटेवरी चालताना....
उरी ठेचकाळून, त्या वेदनेने उभीशी जळाले, तुझा दोष नाही !!

सुखा गोंजराया दहाही दिशांनी लवूनी हजेरी इथे लावलेली,
खड्या संकटांनी, सगे-सोयरेही निमीषी पळाले, तुझा दोष नाही !!

वसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,
तुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही !!

तुझ्या मागुती चालले रे मुक्याने, नि म्हणशील त्याला मी 'मम' म्हणाले,
तुझे वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना कळाले तुझा दोष नाही !!

- सुप्रिया (जोशी) जाधव.

प्रतिसाद

मस्तच !

मतला आणि शेवटचा शेर मस्त झाला आहे.
एकंदर गझल छान..!

ज्ञानेशजी...
अभिजीत....

मनःपूर्वक आभार !

वाहती गझल झाली आहे.

वसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,
तुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही !! - हा शेर आवडला.

तुझ्या मागुती चालले रे मुक्याने, नि म्हणशील त्याला मी 'मम' म्हणाले, - म्हणशील ते सर्व स्वीकारले मी असे केल्यास वृत्तात बसेल.

तुझे वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना कळाले तुझा दोष नाही ! - ही ओळही छान!

धन्यवाद!

तुझ्यासारखे बघ, मलाही सुखाने जगाया न आले, तुझा दोष नाही !
तुझी होत होता, कधीही सख्या मग कुणाची न झाले, तुझा दोष नाही !!

अप्रतीम ,अप्रतीम
क्या बात है यार्,

सुखा गोंजराया दहाही दिशांनी लवूनी हजेरी इथे लावलेली,
खड्या संकटांनी, सगे-सोयरेही निमीषी पळाले, तुझा दोष नाही !!

वसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,
तुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही !!

लिखो तो ,ऐसा लिखो वा वा,

मनःपुर्वक धन्यवाद!!!

क्या बात है!!