बशीर बद्रच्या शेरांचा भावानुवाद
अब तेरे मेरे बीच कोई फासला भी हो...
हम लोग जब मिले तो कोई दूसरा भी हो...
तू जानता नही मेरी चाहत अजीब है
मुझको मना रहा है कभी खुद खफा भी हो...
उसके लिये नो मैनें यहां तक दुवांए की
मेरी तरह उसे कोई चाहता भी हो...
तुझ्या नि माझ्या मधे असू दे काही अंतर
किंवा सोबत तरी कुणी आपल्याबरोबर...
तू न जाणशी माझे आहे प्रेम निराळे
मनधरणी तू का करशी? रागव माझ्यावर...
तुझ्याचसाठी केली होती मी ही इच्छा-
माझ्याइतके प्रेम करावे कुणी तुझ्यावर...
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
कुमार जावडेकर
सोम, 16/07/2007 - 23:07
Permalink
वा!
अजब,
तुझ्याचसाठी केली होती मी ही इच्छा-
माझ्याइतके प्रेम करावे कुणी तुझ्यावर... हा अनुवाद सर्वांत आवडला.
मूळ गझलेत ३च शेर आहेत का?
- कुमार
चित्तरंजन भट
मंगळ, 17/07/2007 - 00:56
Permalink
माझ्याइतके प्रेम करावे...
पहिला आणि तिसरा शेर फार चांगला जमला.
तुझ्याचसाठी केली होती मी ही इच्छा-
माझ्याइतके प्रेम करावे कुणी तुझ्यावर...
वावा!