देखावे..
ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने
वाहतील मोकळे वारे तिथे!
लाभेल शांती तिच्या जिवाला
आनंदे वाहीन भारे तिथे!
फेसाळेल मद्य प्याल्यात आता
कोंडाळतील हावरे सारे तिथे!
मी आस्तिक, मी नास्तिक
उघडीने सारी दारे तिथे!
-- तात्या अभ्यंकर.
गझल:
प्रतिसाद
विसोबा खेचर
मंगळ, 29/06/2010 - 19:24
Permalink
उघडीने सारी दारे तिथे! कृपया
उघडीने सारी दारे तिथे!
कृपया 'उघडीने' येथे 'उघडीन' असे करावे..
तात्या.
विश्वस्त
मंगळ, 29/06/2010 - 19:51
Permalink
ही रचना वृत्तात नाही.
ही रचना वृत्तात नाही. तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने विचाराधीन करण्यात किंवा अप्रकाशित ठेवण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
विसोबा खेचर
मंगळ, 29/06/2010 - 21:40
Permalink
धन्यवाद.. हीच रचना वृत्तात
धन्यवाद..
हीच रचना वृत्तात कशी आणावी हे कुणी सुधारून द्यावे, वा शिकवावे..
पुढील रचनांकरता याचा निश्चित फायदा होऊ शकेल म्हणून ही विनंती..
(शिकाऊ) तात्या.