मुलगी
मुलगी असे अपुली माय
दुधावरची आपुट साय
तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय
उमजे तिला दु:ख आधी
अपंगाचा होते पाय
उडे गोंधळ पडे प्रश्न
उकल शोधुन देते राय
जवळ नसते जेव्हा कधी
माझ्यापाशी उरते काय
गझल:
मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
मुलगी असे अपुली माय
दुधावरची आपुट साय
तळमळीने जपे घरास
परसातली व्याकुळ गाय
उमजे तिला दु:ख आधी
अपंगाचा होते पाय
उडे गोंधळ पडे प्रश्न
उकल शोधुन देते राय
जवळ नसते जेव्हा कधी
माझ्यापाशी उरते काय
प्रतिसाद
ह बा
सोम, 28/06/2010 - 10:16
Permalink
अफालतुन!!!
अफालतुन!!!
कैलास
सोम, 28/06/2010 - 12:13
Permalink
हबांची '' अफलातुन''
हबांची '' अफलातुन'' टर्मिनॉलॉजी.....
बापू,
आपल्या रचने तील आशय चांगला आहे.... पण गझलियत नसल्याने.... रचना आवडली नाही.
डॉ.कैलास
विश्वस्त
मंगळ, 29/06/2010 - 16:52
Permalink
तंत्रशुद्ध नसलेल्या रचना
तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने विचाराधीन करण्यात किंवा अप्रकाशित ठेवण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी. एखादी रचना तंत्रशुद्ध नसूनही विचाराधीन/अप्रकाशित झाली नसल्यास सदस्यांनी विश्वस्तांना कळवावे किंवा प्रतिसादातून लिहावे, ही सगळ्यांना विनंती.
ही रचना तंत्रशुद्ध वाटत नाही आहे.
ह बा
मंगळ, 29/06/2010 - 17:32
Permalink
प्रतिसाद डिलीटेड!
प्रतिसाद डिलीटेड!
प्रशान्त वेळापुरे
बुध, 30/06/2010 - 16:20
Permalink
मुलगी असे अपुली माय दुधावरची
मुलगी असे अपुली माय
दुधावरची आपुट साय
आवडली पण वॄत्तात नाही