मी तुझा
धुंद एकांत होता भेटलीस जेंव्हा
प्रीतीच्या फुलांतुनी झिरपलीस जेंव्हा
बाग येथे बहरली तुझ्या श्वासातुनी..
गंध माझा घेऊनि नाहलीस जेंव्हा
स्वप्न झाले पूर्ण ते तुला जिंकायचे..
देह बाहूंत माझ्या हारलीस जेंव्हा
मी तुला त्या सकाळी ओळखून गेलो..
दर्पणा पाहून तू लाजलीस जेंव्हा
दिवस गेला व्यर्थ अन् रात्र आक्रंदली..
मागल्या पावली तू चाललीस जेंव्हा
थक्क झाल्या चांदण्या, लाजला चंद्रही..
रात सारी इरेला पेटलीस जेंव्हा
मी तुझा... तुझाच होत भारलो क्षणातच..
'मी'पणाची कात तू टाकलीस जेंव्हा
गझल:
प्रतिसाद
ह बा
शुक्र, 18/06/2010 - 13:47
Permalink
स्वप्न झाले पूर्ण ते तुला
स्वप्न झाले पूर्ण ते तुला जिंकायचे..
देह बाहूंत माझ्या हारलीस जेंव्हा
छा$$$$$न!!!
प्रशान्त वेळापुरे
शुक्र, 18/06/2010 - 16:09
Permalink
मी तुला त्या सकाळी ओळखून
मी तुला त्या सकाळी ओळखून गेलो..
दर्पणा पाहून तू लाजलीस जेंव्हा
मस्त....!
अनिल रत्नाकर
रवि, 20/06/2010 - 20:57
Permalink
दिवस गेला व्यर्थ अन् रात्र
दिवस गेला व्यर्थ अन् रात्र आक्रंदली.
आक्रंदली, सुंदर.
अजय अनंत जोशी
गुरु, 24/06/2010 - 20:33
Permalink
प्रतिसाद दिलेल्या - न
प्रतिसाद दिलेल्या - न दिलेल्या सर्व वाचकांचे आभार!
लोभ नसावा, मैत्री असावी.
धन्यवाद!
निलेश कालुवाला
शनि, 26/06/2010 - 08:07
Permalink
मी तुझा... तुझाच होत भारलो
मी तुझा... तुझाच होत भारलो क्षणातच..
'मी'पणाची कात तू टाकलीस जेंव्हा
मस्त शेर.
गंगाधर मुटे
शुक्र, 02/07/2010 - 08:05
Permalink
छान.
छान.
अजय अनंत जोशी
सोम, 05/07/2010 - 18:57
Permalink
धन्यवाद निलेश, गंगाधर.
धन्यवाद निलेश, गंगाधर.
विश्वस्त
मंगळ, 06/07/2010 - 13:57
Permalink
ह्या वृत्ताची लय सापडत नाही
ह्या वृत्ताची लय सापडत नाही आहे.
तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने विचाराधीन करण्यात किंवा अप्रकाशित ठेवण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी. एखादी रचना तंत्रशुद्ध नसूनही विचाराधीन/अप्रकाशित झाली नसल्यास सदस्यांनी विश्वस्तांना कळवावे किंवा प्रतिसादातून लिहावे, ही सगळ्यांना विनंती.