वाणी
नेहमीपेक्षा जरा वेगळा प्रयत्न!
बरी मौनात होते मी, छळाया लागली वाणी
कधी याला, कधी त्याला सलाया लागली वाणी
तुझे ते टोमणे, ते बोचणारे बाण शब्दांचे,
गिळू बघती जरी नजरा, गिळाया लागली वाणी
तुला का भेटले नाही पिडाया आणखी कोणी?
मला खोट्या निमित्ताने पिळाया लागली वाणी
पुरे ना, आटले का सांग या डोळ्यांतले पाणी?
उगा का धाय आता मोकलाया लागली वाणी?
जरा व्हावे मुके आता, पुरे हे बोलणे झाले,
कुणी ऐसे न बोलावे, "चळाया लागली वाणी!"
गझल:
प्रतिसाद
कैलास
गुरु, 01/04/2010 - 19:20
Permalink
खरेच.....नेहमीपे़क्षा वेगळा
खरेच.....नेहमीपे़क्षा वेगळा प्रयत्न.......वाणी ऐवजी ...... ' वाचा' ....किंवा अजून काही असावे..असे प्रकर्षाने वाटते....
छान गझल.
डॉ.कैलास
अजय अनंत जोशी
गुरु, 08/04/2010 - 18:47
Permalink
तुला का भेटले नाही पिडाया
तुला का भेटले नाही पिडाया आणखी कोणी?
मला खोट्या निमित्ताने पिळाया लागली वाणी
छान.
सोनाली जोशी
शनि, 10/04/2010 - 00:26
Permalink
वा वा गझल अतिशय आवडली.
वा वा
गझल अतिशय आवडली.
ह बा
गुरु, 27/05/2010 - 18:46
Permalink
आवडलेला शेरः बरी मौनात होते
आवडलेला शेरः
बरी मौनात होते मी, छळाया लागली वाणी
कधी याला, कधी त्याला सलाया लागली वाणी
बाकीची गझलही उत्तम!