आभाळ चांदण्यांचे...
Posted by नितीन on Sunday, 13 May 2007
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही
गझल
जाहलो मी का असा?
सांग ना रे राजसा
जगास काय! ते करीलही मुलाहिजा
मना, सुनावशील तू खरी मला सजा!
जमायचे न एक हातचेच राखणे
(जमायच्या तशा मला कठीण बेरजा!)
किती किती जपून मी स्मरायचो तुला!
तरी सुगंध सारखे करायचे इजा!
जिथतिथे सुसज्ज स्वागतास वादळे
कशी चुकेल वाट? साथ द्यावया विजा!
किती स्वतःस जाळशील कापरापरी?
सुवास का निमूट व्हायचा कधी वजा!
अनोळखीच वाटतात सर्व चेहरे
जरा जपून आपल्या घरात जात जा!
काळजाला पिसू नये कोणी
कुशल इतके पुसू नये कोणी
जीव घ्यावा खुशाल प्रेमाने
बोचकारू, डसू नये कोणी
कुंतलांशी असे न खेळावे
मग स्वत:शी हसू नये कोणी
ओठ नाजुक बरे, न दुमडावे
वर अबोला कसू नये कोणी
दे जरा मोकळीक अर्थाला
शब्द इतके कसू नये कोणी !
कोण समजूत घालणार अता?
(एवढेही रुसू नये कोणी)
सूर्य पाण्यामधे पहावा पण
काजव्यांना फसू नये कोणी
ओळखीचे असून गाव कसे
ओळखीचे दिसू नये कोणी?
मी नसावे तुझ्यासवे जेव्हा
मी असावे, असू नये कोणी
पेटली ह्रदयात होळी आजही
घेरुनी आली उदासी आजही