काळज्या
उरी काळज्या एवढ्या माजल्या
कवी जाहलो आणि नावाजल्या
जरा एकटे एकटे वाटता
जुन्या काळज्यांना नव्या पाजल्या
सुखाची मला ओढ लागू नये
अशा मत्सराने सदा खाजल्या
करुनी गझल एकएकीची मी
जगाला दिली केवढ्या गाजल्या
जरा साद देताच कुरवाळण्या
जुन्या वाजल्या नवशिक्या लाजल्या
चिताही म्हणे हा जळावा कसा
धगी काळज्यांच्या मला भाजल्या