जुनी शाई नवी शाई लगेचच ओळखू येते
तुझी "इतिहास-भरपाई" लगेचच ओळखू येते
कुठे लपवायला जमते तुला प्रत्येक जखमेला
तुझ्या नटण्यातली घाई लगेचच ओळखू येते
इथे रात्री जरी लाख्खो फुलांचा गंध दरवळतो
मनाने वेंधळी जाई लगेचच ओळखू येते
जरी करतेस शब्दांची अशी आरास सोनेरी
तुझ्या डोळ्यातले बाई लगेचच ओळखू येते
उगाचच कान धरणे तू उगाचच मागणे माफी
कुणी केली दिरंगाई ..लगेचच ओळखू येते
मने पहिल्याच हप्त्याला पुन्हा भजतात स्वस्ताई
खिशांपुढली महागाई लगेचच ओळखू येते
उभी दुनिया जिथे गाते तिची गाणी उजेडाची
तुझी ती किर्र अंगाई लगेचच ओळखू येते
तिचा संसार दिसतो "एकटीचा" ..सर्व बाजुंनी
तुझ्या गर्दीत रखुमाई लगेचच ओळखू येते
~वैवकु
गझल विभागात विचाराधीन म्हणून पाठवणार होतो खूप प्रयत्न केला पण तिथे टाईप वा पेस्टही करता येत नाही आहे म्हणून ह्या सदरात पाठवत आहे कृपया लेखनाचा प्रकाशिण्यासाठी विचार व्अस्जीअशी विनंती
बाकी साईट्मध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल तर बघाल का प्लीज